आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • N. Ramachandran Elected Unopposed As President Of Indian Olympic Association In Delhi On Sunday.

ऑलिम्पिक प्रवेशाचा मार्ग मोकळा; आयओएच्या अध्यक्षपदी एन.रामचंद्रन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदी एन.रामचंद्रन यांची बिनविरोध निवड झाली. ते या पदासाठी एकमेव उमेदवार होते. यासह भारताचा आता ऑलिम्पिकमधील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील 14 महिन्यांपूर्वी आयओएवर बंदीची कारवाई करण्यात आली होती.

आयओएच्या महासचिवपदी राजीव मेहता आणि अनिल खन्ना यांची कोशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. नवनियुक्त अध्यक्ष रामचंद्रन हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. र्शीनिवासन यांचे भाऊ आहेत. तसेच ते भारत आणि आंतरराष्ट्रीय स्क्वॅश महासंघाचेदेखील अध्यक्ष आहेत. तसेच अनिल खन्ना हे अखिल भारतीय टेनिस महासंघाच्या (एआयटीए) अध्यक्षपदी विराजमान आहेत.

रविवारी झालेल्या निवडणुकीत केवळ आठ उपाध्यक्षांसाठीच मतदान झाले. या पदाच्या स्पर्धेत नऊ उमेदवार होते. एक वरिष्ठ उपाध्यक्ष, सहा संयुक्त सचिव आणि कार्यकारी परिषदेच्या नऊ सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. आयओएमधील सर्व नवनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ हा ऑलिम्पिक 2016 पर्यंत असेल.

23 फेब्रुवारीला बैठक
येत्या 23 फेब्रुवारीला आयओसीच्या कार्यकारी मंडळाची सोची येथे बैठक होणार आहे. हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप सोहळ्यापूर्वी ही बैठक होईल. या बैठकीत भारतावरची बंदी हटवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मिशेल म्हणाले.

निवडणूक पर्यवेक्षक नाराज
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) तीन पर्यवेक्षकांनी निवडणुकीविषयी नाराजी व्यक्त केली. ‘आम्ही आता आयओसी अध्यक्ष थॉमस बाक यांना ‘अनुकूल’ अहवाल सादर करणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले. हे पर्यवेक्षक सोमवारी सोचीत दाखल होतील.