आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • N. Srinivasan Confirmed As ICC Chairman, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयसीसीच्या चेअरमनपदी एन.श्रीनिवासन; पुढील आठवड्यात स्विकारणार कार्यभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबॉर्न/नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) चेअरमनपदी नियुक्ती झाली. ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्नमध्ये आयसीसीच्या 52 सदस्यीय परिषदेत श्रीनिवासन यांची अध्यक्षपदी निवड करण्‍यात आली. आयसीसीच्या संविधानात बदल झाल्यानंतर चेअरमनपदी विराजमान होणारे श्रीनिवासन हे पहिले व्यक्ती आहेत. श्रीनिवासन पुढील आठवड्यात आपला कार्यभार स्विकारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. श्रीनिवासन यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे. याशिवाय बांगलादेशाचे मुस्तफा कमाल आयसीसीचे 11वे अध्यक्ष बनले आहे.

श्रीनिवासन यांचा नावाबाबत बीसीसीआयने प्रस्ताव सादर केला होता. दरम्यान, आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचे नाव आल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशावरून श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचे श्रीनिवासन यांचे जावई गुरु मय्यपन याच्यावर आरोप आहे.

दरम्यान, दुबई येथे गेल्या 9 व 10 एप्रिलदरम्यान आयसीसीच्या कार्यकारिणीच्या बैठक झाली‍. एन. श्रीनिवासन हे या बैठकीला उपस्थित होते. एन. श्रीनिवासन हे तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. तसेच बैठकीला जाण्यास कोर्टाने कोणताही आक्षेप घेतला नव्हता. दुसरीकडे, श्रीनिवासन यांनी आयसीसीला आर्थिक विकासाची नवी संकल्पना नुकतीच दिली होती. त्यामुळे आयसीसी व सर्व सदस्यांना अधिक लाभ होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आयसीसीच्या अध्यक्षपदाची माळ श्रीनिवासन यांच्या गळ्यात टाकण्यात आली आहे.

आयसीसीच्या चेअरमनपदी झालेली निवड होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. जगभरात क्रिकेट विकसित करण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया श्रीनिवासन यांनी दिली आहे.(फाइल फोटो- एन. श्रीनिवासन)