आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेशल फोकस: बुद्धिबळाच्या पटावरही अडकले एन. श्रीनिवासन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये आपला दबदबा निर्माण करू पाहणारे अध्यक्ष एन. श्रीनिवासन बुद्धिबळाच्या पटावरही अडकले आहेत. त्यांनी 2005 ते 2011 पर्यंत अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदाचा दुरुपयोग केला. त्यांनी चुकीची माहिती देऊन फेडरेशनच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा निधी उकळला आहे.

हरियाणा बुद्धिबळ असोसिएशनचे महासचिव कुलदीप शर्मा यांनी श्रीनिवासन यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. शर्मा म्हणाले की, 2005 पासून बुद्धिबळाच्या कोलकाता व चेन्नई या दोन संघटनांचा वाद सुरू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यादरम्यान श्रीनिवासन यांनी आपल्या पदाचा वापर करून क्रीडा मंत्रालयातून संघटनेच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळवले. यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार देण्यात आलेला नव्हता.

तसेच माहितीच्या अधिकाराखाली मागवण्यात आलेल्या माहितीमध्ये श्रीनिवासन यांच्या गटाच्या संघटनेने अधिकृत असल्याची कोणत्याही प्रकारची पूर्तता पूर्ण केलेली नाही. मात्र, आपल्या पदाचा वापर करून श्रीनिवासन यांनी अनुदान लाटले, असेही ते म्हणाले.

2010-11 मध्ये हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान बुद्धिबळ संघटनेने संयुक्तपणे दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत श्रीनिवासन हे मंडळाचे सदस्य आहेत आणि फेडरेशनचे अध्यक्षदेखील आहेत, असे म्हटले होते. त्यामुळे त्यांनी संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणामुळे आता पुन्हा एकदा श्रीनिवासन अडचणीत येण्याची शक्यता आहे.