आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एन. श्रीनिवासन यांच्यासमोर दुहेरी आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचे एन. श्रीनिवासन यांना आयसीसीच्या पहिल्या चेअरमनपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळाला आहे. नुकत्याच मेलबोर्न येथे झालेल्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीत एकमताने त्यांची निवड करण्यात आली.या निवडीबद्दल श्रीनिवासन यांचे जगभरात स्वागत केले गेले. ‘क्रिकेटच्या विकासासाठी सर्मपणाच्या भावनेने काम करणार आहे,’ असेही श्रीनिवासन यांनी निवडीनंतर स्पष्ट केले. तसेच बैठकीत आयसीसीच्या बोर्डाची समिती स्थापण्यात आली. यात भारताशिवाय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियालाही प्रतिनिधित्व मिळाले आहे. आता हे तिन्ही देश क्रिकेटमधील बिग थ्री असतील. यामध्ये बदल करण्याचे परिपूर्ण अधिकार या तिघांकडे असतील आणि महसूल वाढवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असेल.

पीसीबीचे अध्यक्ष व वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांचीही कार्यकारी समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या महासंघाने (फिका) श्रीनिवासन यांच्या निवडीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, श्रीनिवासन यांच्या जावयावर आयपीएल फिक्सिंगप्रकरणी केस सुरू आहे आणि श्रीनिवासन यांना याप्रकरणी बीसीसीआयचे अध्यक्षपदही सोडावे लागले. अशात त्यांना क्लीन चिटही मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी पदभार स्वीकारू नये. याप्रकरणी मेलबर्न येथे श्रीनिवासन म्हणाले की, फिक्सिंगप्रकरणी लावलेल्या आरोपांचा माझा जावई सामना करेल. त्या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. तसेच या प्रकरणाच्या चौकशीपर्यंत श्रीनिवासन यांना सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून दूर राहण्याचे सांगितले होते. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले होते की, श्रीनिवासन यांनी आयसीसीच्या कोणत्याही पदाची जबाबदारी स्वीकारली तरीही त्यावर न्यायालय कोणताही आक्षेप घेणार नाही.

चेअरमन म्हणून निवड झालेल्या श्रीनिवासन यांच्यासमोर क्रिकेटमधील भ्रष्टाचार दूर करण्याचे मोठे आव्हान असेल. दोन वर्षांच्या कार्यकाळात श्रीनिवासन यांच्यावर सर्वांची नजर असेल. श्रीनिवासन यांच्यासमोर आता दुहेरी आव्हान असेल. कसोटी क्रिकेटची घटलेली लोकप्रियता आणि क्रिकेटला जगातील नंबर वन खेळ करण्याचे दुहेरी आव्हान श्रीनिवासन यांच्यासमोर असेल. जिथपर्यंत कसोटीचा प्रश्न आहे, अनेक सुपर स्टार हे देशांऐवजी क्लब क्रिकेटलाच पहिली पंसती दर्शवत आहेत. उदाहरणार्थ गत महिन्यात ऑफस्पिनर सुनील नरेनने राष्ट्रीय टीम वेस्ट इंडीजला वगळता आयपीएल-7 मध्ये कोलकात्याकडून खेळण्यास पहिली पसंती दिली. याला रोखण्याचे मोठे आव्हान श्रीनिवासनसमोर आहे. भारत व पाक कसोटी मालिकेचे आयोजन हे टेस्ट क्रिकेटसाठी अधिक महत्त्वाचे आहे. क्रिकेटसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. क्रिकेटला जगातील नंबर वन बनवण्यासाठी टी-20 क्रिकेट या फॉरमॅटला जपान, ब्राझील आणि चीनसारख्या देशांमध्ये सुरू करून अफाट लोकप्रियता मिळवून दिली जाऊ शकते.