आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • N Srinivasan Elected Unopposed As BCCI President For A Third Year.

एन. श्रीनिवासनची पुन्हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- बीसीसीआयच्या रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) सर्वकाही श्रीनिवासन यांच्या मर्जीनुसार घडले. सलग तिसर्‍या वर्षासाठी त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. तीसुद्धा बिनविरोध. इतकेच नव्हे, तर त्यांनी आपल्या पसंतीची टीम निवडली.

संजय पटेल सचिव, तर अनिरुद्ध चौधरी कोशाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. रंजीब बिस्वाल आयपीएलचे नवे चेअरमन असतील. मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रवी सावंत बीसीसीआयचे उपाध्यक्ष झाले आहेत.

बीसीसीआयच्या बैठकीला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. दोन तास चाललेल्या या बैठकीत श्रीनिवासन यांना आव्हान मिळाले नाही. त्यांच्याविरुद्ध एकही उमेदवार लढला नाही. श्रीनिवासन यांच्याशिवाय त्यांच्या समर्थकांचा कार्यकाळसुद्धा एका वर्षाने वाढला. श्रीनिवासन सलग तिसर्‍या वर्षी मंडळाचे अध्यक्ष असतील, असे असले तरीही ते सध्या पदभार स्वीकारू शकत नाहीत. क्रिकेट असोशिएशन आॅफ बिहारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पदभार स्वीकारण्यास मनाई केली आहे. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत ते पदभार स्वीकारू शकणार नाहीत. या प्रकरणाची पुढची सुनावणी सोमवारी होणार आहे. आयपीएल चेअरमनसाठी बिस्वाल आणि जगमोहन दालमिया यांच्यात शर्यत होती. मात्र, बिस्वाल यांनी बाजी मारली.

बीसीसीआयची नवी टीम
अध्यक्ष : एन. श्रीनिवासन
सचिव : संजय पटेल
कोशाध्यक्ष : अनिरुद्ध चौधरी
उपाध्यक्ष : राजीव शुक्ला (मध्य विभाग), एस. के. बंसल (उत्तर), रवी सावंत (पश्चिम), शिवलाल यादव (दक्षिण), चित्रक मित्रा (पूर्व).
संयुक्त सचिव : अनुराग ठाकूर.
टूर अँड प्रोग्राम कमिटीचे प्रमुख : राजीव शुक्ला.

अधिक वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...