आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनिवासन यांनी न्यायालयाचा आदेश पाळावा : माजी खेळाडूंचा सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोलचे (बीसीसीआय) अध्यक्षपद श्रीनिवासन यांनी सोडून द्यावे तसेच चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सला या दोन संघांना आयपीएलच्या सातव्या सत्रातून हद्दपार करण्याबाबतचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर या आदेशांचे पालन करण्याचे आवाहन बहुतांश माजी खेळाडू आणि पदाधिकार्‍यांनी केले आहे.

स्पॉट फिक्सिंग घोटाळा आणि आयपीएल सामन्यांतील सट्टा प्रकरणाचा जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत भारताचे माजी कप्तान सुनील गावसकर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राहण्यासह चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांना स्पर्धेबाहेर ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच इंडिया सिमेंटच्या कोणत्याही पदाधिकार्‍याने बीसीसीआयच्या कारभारात हस्तक्षेप करू नये, असे आदेशदेखील न्यायालयाने दिले आहेत.

श्रीनिवासन यांना संघच विकणे अयोग्य होते : रवी सावंत
चेन्नई सुपर किंग्जचा संघ श्रीनिवासन यांना विकत घेऊ देणेच अयोग्य होते, असा दावा बीसीसीआयचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी केला आहे. कोणत्याही संघाकडून पक्षपात करणारी व्यक्ती संघटनेच्या पदावर असणे अयोग्यच असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याच वेळी ही चूक झाली होती. निदान आता तरी बीसीसीआयने न्यायालयाच्या आदेशांचे पालन करायला हवे, असेही सावंत म्हणाले. आता मंडळाची तातडीची बैठक बोलावण्यासही अवधी नसून न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे सावंत म्हणाले.

के. श्रीकांत, राहुल द्रविड, कुंबळेही आदेशाच्या बाजूने
माजी कप्तान राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांनीदेखील न्यायालयाचा आदेश मानलाच पाहिजे, असे म्हटले. के. श्रीकांत यांनी न्यायालयाने नक्की काय म्हटले आहे, ते मला अद्याप पूर्ण समजलेले नाही. मात्र, न्यायालयाने काही आदेश दिला असेल तर तो पाळला गेलाच पाहिजे, असेही श्रीकांतने नमूद केले.

सफाई करण्याची गरज : शहा
बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शहा यांनी जनतेचा क्रिकेटमधील रस संपुष्टात येण्यापूर्वी सर्व यंत्रणेची सफाई करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. अध्यक्षांना असे वाटते की, त्यांनी कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही. मात्र, तो त्यांचा दृष्टिकोन आहे. प्रसारमाध्यमे आणि संपूर्ण जगाचे याबाबतचे मत भिन्न असल्याचे माजी खजिनदार अजय शिर्के यांनी म्हटले.