आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • N Srinivasan Should Resign From BCCI Says Joint Secretary

बीसीसीआयची बैठक रविवारी, श्रीनिवासन यांच्‍या गच्‍छंतीसाठी काही तासांचा अवधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- स्‍पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर बीसीसीआयचे अध्‍यक्ष एन. श्रीनिवासन यांच्‍यावर राजीनाम्‍यासाठी दबाव आणखी वाढला आहे. दोन सदस्‍यांनी राजीनामा दिल्‍यानंतर आता बीसीसीआयचे सहसचिव अनुराग ठाकूर यांनीही श्रीनिवासन यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे मत व्‍यक्त केले आहे. यासंदर्भात बीसीसीआयची तातडीची बैठक रविवारी सकाळी 11.30 वाजता बोलाविण्‍यात आली आहे. स्‍वतः श्रीनिवासन यांनी 8 जूनला बैठक बोलाविली होती. परंतु, ती बैठक लवकरच बोलाविण्‍यात यावी, अशी विनंती अध्‍यक्षांना करण्‍यात आल्‍याचे ठाकूर यांनी सांगितले. या बैठकीत श्रीनिवासन राजीनामा देण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे.

अनुराग ठाकूर यांच्‍यासह बीसीसीआयचे उपाध्‍यक्ष अरुण जेटली यांनीही काही मोठ्या घडामोडींचे संकेत दिले आहेत. येत्‍या 24 तासांमध्‍ये मोठी बातमी कळेल, असे अरुण जेटली यांनी सांगितले. त्‍यांचा रोख श्रीनिवासन यांच्‍याबाबत असल्‍याचे संकेत मानले जात आहेत.

बीसीसीआयचे सचिव संजय जगदळे आणि कोषाध्‍यक्ष अजय शिर्के यांनी काल राजीनामा दिला. श्रीनिवासन राजीनामा देत नाही, म्‍हणून आम्‍हीच पदाचा त्‍याग करतो. याप्रकरणामुळे खेळाची प्रतिमा मलिन झाले आहे, असे शिर्के आणि जगदळे यांनी सांगितले. दोघांच्‍या राजीनाम्‍यामुळे बीसीसीआयमध्‍ये खळबळ उडाली आहे. त्‍यामुळे आपातकालीन बैठक लवकरच बोलाविण्‍याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले. श्रीनिवासन राजीनामा देणार का, असे विचारल्‍यावर ठाकूर यांनी नकारात्‍मक प्रतिक्रीया दिली. राजीनामा न दिल्‍यास त्‍यांना हटविण्‍यासाठी मतदान घ्‍यावे लागेल आणि प्रभारी अध्‍यक्ष निवडावा लागेल. त्‍यांनी राजीनामा दिल्‍यास निवडणूक होईल आणि नवा अध्‍यक्ष निवडला जाईल, असे ठाकूर यांनी सांगितले. मात्र, एकूण परिस्थितीचा विचार करता निष्‍पक्ष चौकशीसाठी श्रीनिवासन यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे ठाकूर यांनी स्‍पष्‍ट केले.