आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राफेल नदालने मारली बाजी, यूएस ओपनवर मिळवला दुस-यांदा कब्‍जा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्‍यूयॉर्क- स्‍पेनच्‍या राफेल नदालने जागतिक क्रमवारीत नंबर एकवर असलेल्‍या नोव्‍हाक जो‍कोविचला पराभूत करून दुस-यांदा यूएस ओपनवर आपले नाव कोरले.

जागतिक क्रमवारीत नंबर दोनवर असलेल्‍या नदालने सर्बियाच्‍या जोकोविचचा 6-2, 3-6, 6-4 आणि 6-1ने पराभूत करून आपले 13वे ग्रँड स्‍लॅम जिंकले.

नदाल सर्वाधिक ग्रँड स्‍लॅम पटकविण्‍यामध्‍ये स्वित्‍झर्लंडच्‍या रॉजर फेडरर (17) आणि अमेरिकेचा पीट सॅम्‍प्रॅस(13) नंतर तिस-या नंबरवर आहे.

ऑस्‍ट्रेलियन ओपन चॅम्पियन जोकोविचने पहिला सेट हरल्‍यानंतर दुसरा सेट जिंकून 1-1 अशी बरोबर साधली होती. तथापि पुढचे दोन्‍ही सेटमध्‍ये तो पराभूत झाला. नदालने तीन तास 41 मिनिटांत हा सामना जिंकला.