आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nadal, Fedarar, Serena Win Second Round In Wombaldon, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विम्‍बल्‍डन ओपन: नदाल, फेडरर, सेरेना तिस-या फेरीत दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत स्पेनचा दिग्‍गज टेनिसपटू राफेद नदाल, स्वीत्झर्लंडचा रॉजर फेडरर तसेच महिला विभागात अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांनी तिस-या फेरीत प्रवेश मिळविला आहे.
 
पुरुष एकेरीमध्‍ये नदालने झेकच्‍या  लुकास रोसॉलचा 4-6, 7-6 (8-6), 6-4, 6-4 अशा फरकाने पराभव केला.
 
आतापर्यंत नऊ वेळा विम्‍बल्‍डन जिंकणा-या फेडररने लक्झ्मबर्गच्या मुलेरवर 6-3, 7-5, 6-3 अशी मात केली.
 
महिला एकेरीच्या दुसऱया फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने द. आफ्रिकेच्या चॅनेली स्किपेर्सचा केवळ 49 मिनिटात 6-1, 6-1 ने धुव्‍वा उडविला. सेरेनाचा पुढील सामना फ्रान्‍सच कॉमेटशी असणार आहे.