आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nadal, Federra, Yocovic Real Claimaent In Bimbledon

विम्बल्डनचे राफेल नदाल, फेडरर, योकोविक दावेदार !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - टेनिसच्या महान खेळाडूंत सामील असलेला रॉजर फेडरर सोमवारपासून विम्बल्डनच्या कोर्टवर उतरेल, तेव्हा त्याचे लक्ष आपल्या 18 व्या विक्रमी ग्रँडस्लॅम विजेतेपदाकडे असेल. फेडररचा मार्ग तसा सोपा राहणार नाही. त्याला नोवाक योकोविक, राफेल नदाल आणि अँडी मुरे यांच्याकडून जोरदार आव्हान मिळू शकते.


सात वेळेसचा विम्बल्डन चॅम्पियन आणि तिस-या क्रमांकाचा खेळाडू फेडररने आपला अखेरचा ग्रँडस्लॅम मागच्या वर्षी विम्बल्डनमध्येच जिंकला होता. या सत्रात त्याला संघर्ष करावा लागला आहे. या सत्रात
त्याला फक्त एक किताब जिंकण्यात यश आले. फेडरर फ्रेंच ओपनमध्येसुद्धा उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला होता. शुक्रवारी काढण्यात आलेल्या सोडतीनुसार तिसरा मानांकित फेडरर आणि नदालचा सामना उपांत्यपूर्व आणि मुरेचा उपांत्य फेरीत होऊ शकतो. फेडररने मागच्या वर्षी मुरेला पराभूत करूनच बाजी मारली होती.