आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nadal, Federre, Sharapova Entered In Second Round In Australia Open

ऑस्ट्रेलियन ओपन : नदाल, फेडरर, शारापोवा दुस-या फेरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - जगातील माजी नंबर वन राफेल नदाल, लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन अँडी मरेने सोमवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. दुसरीकडे भारताचा युवा खेळाडू युकी भांबरी, सर्बियाची अॅना इव्हानोविकचे आव्हान संपुष्टात आले. रशियाच्या मारिया शारापोवाने दुसरी फेरी गाठली. तिने पहिल्या फेरीत क्रोएशियाच्या मार्टिसचा ६-४, ६-१ अशा फरकाने पराभव केला.

युकी भांबरीची झुंज अपयशी : भारताचा युवा खेळाडू युकी भांबरीने तीन सेटपर्यंत दिलेली झुंज अपयशी ठरली. इंग्लंडचा नंबर वन अँडी मरेने पहिल्या फेरीत युकीचा ६-३, ६-२, ७-६ अशा फरकाने पराभव केला. अॅना इव्हानोविकचे स्वप्न भंगले सर्बियाची अव्वल खेळाडू अॅना इव्हानोविकचे किताब जिंकण्याचे स्वप्न भंगले. तिला लुसी
राडेकाने अनपेक्षितपणे पराभूत केले. राडेकाने सलामी सामन्यात १-६, ६-२, ६-२ ने विजय मिळवला.

राफेल नदाल विजयी
१४ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदाल याने पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात रशियाच्या मिखाईल योज्नीचा पराभव केला. नदालने ६-३, ६-२, ६-२ अशा फरकाने विजयी सलामी दिली.

फेडररचा रोमहर्षक विजय
पाचव्या किताबासाठी प्रयत्नशील असलेल्या रॉजर फेडररला पहिल्या फेरीत शर्थीची झुंज द्यावी लागली. त्याने तैपेईच्या वाय. लूविरुद्ध रोमहर्षक विजयाची नोंद केली. त्याने ६-४, ६-२, ७-५ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने दुसरी फेरी गाठली. तसेच दिमित्रोवने इंग्लंडच्या ब्राऊनचा ६-२, ६-३, ६-२ ने पराभव केला.