आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदाल, शारापाेवाचे अाव्हान संपुष्टात, स्टुटगार्ट / बार्सिलाेना अाेपन : फेबियाे विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टुटगार्ट/बार्सिलाेना - जगातील माजी नंबर वन राफेल नदाल अाणि मारिया शारापाेवाला अनपेक्षित पराभवामुळे टेनिस स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. स्पेनच्या नदालचे बार्सिलाेना अाेपन टेनिस स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. त्याला पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत इटलीच्या फेबियाे फाेगनिनीने पराभूत केले.
१३ व्या मानांकित खेळाडूने ६-४, ७-६ ने विजयाची नाेंद केली. यासह त्याने स्पर्धेच्या अंतिम अाठमधील प्रवेश निश्चित केला. नदालने पहिल्या सेटमध्ये बाजी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला समाधानकारक अशी खेळी करता अाली नाही. इटलीच्या फाेगनिनीने पहिला सेट अापल्या नावे केला. पहिल्या सेटमधील अपयशाला बाजूला सारून नदालने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला हाेता.

केर्बरकडून शारापाेवाचा पराभव
तीन वेळची चॅम्पियन मारिया शारापाेवाला स्टुटगार्ट अाेपन टेनिस स्पर्धेच्या सलामी सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. क्ले काेर्टवरच्या या सामन्यात जर्मनीच्या एंजेलिक केर्बरने रशियाच्या खेळाडूवर २-६, ७-५, ६-१ अशा फरकाने विजय संपादन केला. विजयासह जर्मनीच्या खेळाडूने दुसऱ्या फेरीत धडक मारली.