आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nadal, Sharapova Third Round In French Open Tennis, Divya Marathi

नदाल, शारापोवा तिसर्‍या फेरीत तर सानिया-कारा ब्लॅक दुसर्‍या फेरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - जगातील नंबर वन राफेल नदाल आणि माजी नंबर वन महिला खेळाडू मारिया शारापोवाने गुरुवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत धडक मारली. तिसर्‍या मानांकित अग्निजस्का रदांवास्काने विजय मिळवून आगेकूच केली.

अव्वल मानांकित राफेल नदालने पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थिईमाचा पराभव केला. त्याने 6-2, 6-2, 6-3 अशा फरकाने सामना जिंकला. यासाठी त्याला डोमिनिकने तीन सेटपर्यंत झुंजवले. महिला गटात मारिया शारापोवाने बुल्गारियाच्या स्वेताना पिरोनकोवाला सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली. तिने 7-5, 6-2 ने विजय मिळवला. तसेच रदांवास्काने चेक गणराज्यच्या कॅरोलिनाचा 6-3, 6-4 ने पराभव केला.
दुसरीकडे पाचव्या मानांकित डेव्हिड फेररने पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली. त्याने दुसर्‍या फेरीत इटलीच्या सिमोन बोलल्लीचा पराभव केला. फेररने 6-2, 6-3, 6-2 अशा फरकाने सामना जिंकला. मात्र, यासाठी त्याला इटलीच्या खेळाडूूने तब्बल एक तास 48 मिनिटे झुंजवले. पाचव्या मानांकित फेररने दमदार सुरुवात करताना पहिला सेट 36 मिनिटांत जिंकला. त्यापाठोपाठ दुसरा व तिसरा सेट अनुक्रमे 37 व 35 मिनिटांत आपल्या नावे करून सामना जिंकला. सहाव्या मानांकित जेलेना यांकोविकने तिसर्‍या फेरीतील प्रवेश निश्चित केला. तिने जपानच्या कुरुमी नाराला सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली. सर्बियाच्या यांकोविकने 7-5, 6-0 ने विजय मिळवला तसेच 21 व्या मानांकित के. फ्लिपकेन्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तिला जे. ग्लुश्कोने 6-4, 6-3, 6-4 ने सामना जिंकला.
सानिया-कारा ब्लॅक दुसर्‍या फेरीत
भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झाने गुरुवारी झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसोबत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत धडक मारली. या पाचव्या मानांकित जोडीने महिला दुहेरीच्या सलामी सामन्यात अवघ्या 69 मिनिटांत शानदार विजय मिळवला. सानिया-काराने दुहेरीच्या लढतीत स्लोव्हाकियाची डॅनियल हंतुचोवा आणि सारा पीरचा 6-3, 6-3 अशा फरकाने पराभव केला.

फ्रेंच ओपन : डेव्हिड फेररचा एक तास 48 मिनिटांत 6-2, 6-3, 6-2 ने विजय