ब्रिस्बेन - नमन ओझाचे दमदार द्विशतक (219) आणि जसप्रीत बुमराह याने घेतलेल्या तीन विकेटच्या भरवशावर भारत ‘अ’ संघाने ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध सुरू असलेल्या चारदिवसीय सामन्यावर घट्ट पकड जमवली आहे. भारताने या सामन्याच्या दुसर्या दिवशी 9 गडी बाद 475 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 44.4 षटकात 6 गडी बाद 126 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी, भारतीय संघाने रविवारच्या 6 बाद 304 धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली.
फलंदाज नमन ओझा (82) आणि धवल कुलकर्णी (12) यांनी सोमवारच्या खेळाला सुरुवात केली. ओझाने आपल्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत 250 चेंडूत 29 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 219 धावांची खेळी केली. भारतीय संघाचा धवल कुलकर्णी मात्र 33 धावा काढूनच बाद झाला.
फोटो - आयपीएलमधील फाईल फोटो