आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Naman Ojha To Play In England Test Series News In Marathi

कसोटी मालिका जिंकण्‍यासाठी संघात फेरबदल करणार धोनी? नमन ओझा इंग्‍लडला रवाना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंग्लंडविरुद्ध तिसर्‍या कसोटीत दिग्गज फलंदाजाच्या गचाळ कामगिरीमुळे भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. तरी धोनी सहजासहजी पराभव मानायला तयार नाही. हा पराभव धोनीच्‍या चांगल्‍याच जिव्‍हारी लागला असून आगामी कसोटीमध्‍ये धोनी संघामध्‍ये महत्‍वपूर्ण बदल करणार आहे. त्‍यासाठीच नमन ओझाला इंग्‍लडमध्‍ये पाचारण केले आहे.
यजमान इंग्लंडने तिसर्‍या कसोटीत 266 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. भारताचा बॅकअप विकेटकीपर ऋध्दिमान साहाने दुखापतीमुळे इंग्‍लड दौ-यातून माघार घेतली आहे. त्‍याच्‍याजागी नमन ओझाला संघात घेण्‍याची शक्‍यता क्रिडातज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केली आहे.
नमन ओझाने नुकत्‍याच संपन्‍न झालेल्‍या भारत-ए आणि ऑस्‍ट्रेलिया -ए संघाच्‍या लढतीदरम्‍यान ऑस्‍ट्रेलियाच्‍या धर्तीवर सलग तीन शतक झळकावले आहेत.
मधल्‍या फळीत यशस्‍वी ठरु शकतो ओझा
मधल्‍या फळीतील फलंदाजांच्‍या गलथानपणामुळे भारतावर पराभवाची नामुष्‍की ओढवली आहे. त्‍यामुळे कर्णधार महेंद्रसिंह धोनी मधल्‍या फळीतील विराट कोहली किंवा रोहित शर्माला डच्‍चू देवू शकतो.
धोनीने पहिल्‍या दोन कसोटीमध्‍ये स्‍टुअर्ट बिन्‍नीला जागा दिली होती. परंतु बिन्‍नी त्‍याचा करिश्‍मा दाखवू शकला नाही. त्‍याऐवजी धोनीने रोहित शर्माला संधी दिली होती. बोल्‍ड निर्णय घेण्‍यामध्‍ये धोनी माहिर आहे. नमन ओझाला संघात घेण्‍याचे धाडस धोनी करु शकतो.
पुढील स्‍लाइडवर वाचा, गोलंदाजी बनली समस्‍या