आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Sports, Ankita Raina

नरेंद्र मोदींमुळे झाला अंकिता रैनाचा प्रवास सुकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ज्याप्रमाणे एखाद्या सैनिकाला मानसन्मानाची वागणूक मिळायला हवी, तशीच वागणूक देशासाठी खेळणार्‍या कोणत्याही खेळाडूलादेखील मिळायला हवी, असे विधान एकदा मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना केले होते. त्या विधानाबाबत ते किती गंभीर आहेत, त्याची प्रचिती एकेरीतील भारताची अग्रमानांकित टेनिस खेळाडू अंकिता रैनालादेखील आली. देशाबाहेरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी अंकिताला येणार्‍या समस्यांचे गार्‍हाणे तिने मोदींना सांगताच त्या समस्या चुटकीसरशी संपुष्टात आणत तिला केवळ खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला मोदींनी दिला.

गतवर्षी मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा अंकिताने गुजरातच्या क्रीडा विभागात भेटून तिची समस्या मांडली होती. आर्थिक तंगीमुळे तिला बाहेरील देशांतील सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होणे शक्य होत नसल्याचे तिने सांगितले होते. त्यामुळे 2013 मध्ये 13 स्पर्धांमध्येच तिला सहभागी होता आले. मात्र, मोदींनी दिलेल्या सुस्पष्ट आदेशांमुळे अंकिताला 7 स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवणे शक्य झाले आहे.

‘तू फक्त खेळ’ असे म्हणत मोदींचा पाठिंबा
मी ज्या वेळी मोदींपुढे माझी समस्या मांडली, त्या वेळी त्यांनी मला तू फक्त खेळावर लक्ष केंद्रित कर, बाकी सारं आम्ही बघून घेऊ, असे म्हटल्याचे अंकिताने नमूद केले. उझबेकिस्तानला जाण्यापूर्वी तिने आत्मकथन केले. गुजरात शासनाने शक्तिदूत योजनेअंतर्गत केलेल्या या मदतीचा फायदा झाल्याचेही अंकिताने नमूद केले. त्याशिवाय राज्य शासनाकडून 15 लाखांची मदत करण्यात आल्याचे ती म्हणाली. त्यामुळे आता कोणत्याच स्पर्धेला जाण्याच्या खर्चासाठी कर्ज काढावे लागत नसल्याने त्यांची सदैव ऋणी असल्याचेही तिने सांगितले.