आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरसिंग यादवला नाडाकडून क्लीन चिट, रिओला जाण्याची शक्यता वाढली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचा अव्वल मल्ल नरसिंग यादवच्या बाजूने नाडाने निर्णय देताच त्याच्या समर्थकांनी असा जल्लोष केला. - Divya Marathi
भारताचा अव्वल मल्ल नरसिंग यादवच्या बाजूने नाडाने निर्णय देताच त्याच्या समर्थकांनी असा जल्लोष केला.
नवी दिल्ली- डोपिंगमध्ये अडकलेला भारताचा अव्वल पैलवान नरसिंग यादवला नॅशनल डोपिंग एजन्सी (नाडा)ने आज सायंकाळी क्लीन चिट दिली. दरम्यान, नरसिंगला क्लीन चिट मिळाल्याने तो रिओ ऑलिंपिकमध्ये खेळण्याची शक्यता पुन्हा एकदा बळावली आहे. नरसिंगला त्याचा रूममेट संदीप तुलसी यादव यांची सुद्धा डोपिंग टेस्ट फेल झाल्याचा फायदा झाला आहे. संदीप तुलसी यादव आगामी काळात कुठलीही स्पर्धा खेळणार नाही. नाडाच्या शिस्तपालन समितीने हे मान्य केले की, संदीप ऑलिंपिक टीममध्ये नाही. तो नजीकच्या कोणत्याही स्पर्धेत खेळणार नाही. अशा वेळी त्याच्या शरीरातील घटक आणि नरसिंगच्या शरीरातील घटक सारखे येणे म्हणजेच नरसिंग एखाद्याच्या कटकारस्थानाचा बळी ठरलेला असू शकतो. काय म्हणणे आहे नाडाचे....
- नाडाच्या शिस्तपालन समितीच्या पथकाने सांगितले की, नरसिंगच्या खाण्यात कोणीतरी काही मिसळले असेल.
- तिकडे, पोलिसांनी रविवारी सोनीपतमधील साई सेंटरमधील संचालिका राधिका श्रीमान यांची चौकशी केली.
- सीआयए प्रमुख इंदीवीरने सांगितले की, हॉस्टेलची सुरक्षा, बाहेरील लोकांचे येणे-जाणे, खेळाडूंची लिखित तक्रार आदी मुद्दे तपासात लक्षात घेतले आहेत.
- दुसरीकडे, टीम कोच सत्पाल यांच्या आखाड्यात सराव करणा-या एका अल्पवयीन पैलवानाच्या घरीही पोलिस पोहचले होते. त्यांना सांगण्यात आले की आरोपी कावड आणण्यासाठी हरिद्वारला गेला आहे.
- सीआयएने त्याला 3 ऑगस्टपर्यंत तपास कामासाठी हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र तो संपर्कातच नाही. त्याच्यावरच नरसिंगच्या जेवणात उत्तेजक टाकल्याचा आरोप आहे.
- त्याआधी नरसिंग यादवे नाडाच्या समोर 500 पानाचे प्रतिज्ञापत्र सादर करताना आपल्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता.
- तसेच हे आरोप करताना काही तथ्ये नाडासमोर ठेवली होती. त्याचा विचार नाडाने केलेला दिसत आहे.
नरसिंगला फार मोठा दिलासा-
- डोपिंग प्रकरणी मल्ल नरसिंग यादवबाबत आज सायंकाळी अंतिम निर्णय येणे अपेक्षित होते त्यानुसार आज हा निर्णय आला आहे.
- याप्रकरणी राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेकडे (नाडा) शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती. त्यावर कोणताच निर्णय होऊ शकला नव्हता.
- सर्व अहवाल, कागदपत्रे आणि माहिती नाडाकडे देण्यात आली. त्यानंतर आज सायंकाळी हा बहुचर्चित निर्णय आला. यात नरसिंगला फार मोठा दिलासा मिळाला आहे.
- नरसिंग यादवच्या रिओ ऑलिंपिक सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने प्रविणला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
- भारताला ऑलिंपिकमध्ये 74 किलो वजनी गटातील दावेदारी गमविण्याची पाळी येऊ नये, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय ऑलिंपिक संघटनेने हा निर्णय घेतला होता.
- आता मात्र पुन्हा एकदा नरसिंगचा रिओला जाण्याची शक्यता बळावली आहे.
नरसिंगच्या कुकने केला होता खुलासा-
- पैलवान नरसिंग यादवच्या डोपिंग प्रकरणात मोठा गौप्यस्फोट त्याच्या कुकने केला होता.
- नरसिंगसाठी जेवण बनवणाऱ्या चंदनने सांगितले होते की, 5 जूनला मी नरसिंगसाठी भाजी बनवत होतो.
- टोमॅटो आणण्यासाठी मी स्टोअरमध्ये गेलो. इतक्यात ज्युनियर कॅम्पमधील एक मुलगा नरसिंगच्या भाजीत काहीतरी मिसळत होता.
- तो कोण असल्याची विचारणा मी मेसवाल्यांना केली. मात्र, कुणीच काही उत्तर दिले नाही.
- दुसरीकडे, भाजीला फेस येत असल्याचे दिसले. याची माहिती दिल्यानंतर नरसिंगने भाजी फेकून दिली.
- मात्र, या घटनेच्या आधी आणि नंतर असा प्रकार घडला होता की नाही, याची मला माहिती नाही.

नरसिंगने आत्महत्येचा केला होता प्रयत्न-
- काही दिवसांपूर्वी ऑलिम्पिकची तयारी करत असलेला मल्ल नरसिंग यादव डोपिंग चाचणीत फेल झाल्यानंतर खूप निराश आणि दु:खी झाला होता.
- डोपिंगची माहिती मिळताच निराश नरसिंगने आत्महत्या करण्याचा विचार केला होता, असे त्याच्या एका जवळच्या मित्राने सांगितले होते.
- याबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही. कोच जगमलसिंग यांनी याबाबत स्पष्टपणे काहीच सांगितले नाही.
सुशीलला हिरो मानतो नरसिंग-
- नरसिंगच्या मित्राने सांगितले की, नरसिंग आतून खूप मजबूत आहे. त्याने आपल्या स्वत:च्या बळावर ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले.
- साई सेंटरमध्ये तो सुशील आणि योगेश्वर दत्तच्या फोटो खाली सराव करायचा. तो आजही या दोन मल्लांना आपला हीरो मानतो.
सीआयडीला माहिती आधीपासून होती?-
- सीआयडीने आपल्या अहवालात आधीच सांगितले होते की, ऑलिम्पिकला जाण्यासाठी सुशील आणि नरसिंग यांच्यात सुरू असलेल्या वादाचा फायदा बाहेरचे लोक उचलू शकतात.
- त्यांनी याबाबत नरसिंगला माहिती देताना त्याला बाहेर कुठेतरी सराव करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्याने असे करण्यास नकार दिला.
काय आरोप होते नरसिंगवर-
- पहिल्या आणि दुसऱ्या डोपिंग चाचणीत फेल झाल्याने दोषी धरले गेले.
- चुकून का होईना शरीरात उत्तेजक पदार्थ गेल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच फूड सप्लिमेंटमध्ये कोणतीही भेसळ नसल्याने त्याच्या अडचणी वाढल्या होत्या.
- डोपिंग कसे झाले याची नेमकी माहिती देण्यात नरसिंग अपयशी ठरला होता. मात्र, आपल्याविरोधात षडयंत्र रचल्याचा त्याचा जाहीर आरोप होता.
- नाडाने नरसिंगचा दावा मान्य केला. याला संदीप तुलसी यादवची डोपिंग टेस्ट फेल आल्याने कटकारस्थान रचून त्याच्या जेवणात भेसळ केले असण्याची शक्यता नाडाने मान्य केली.
पुढे वाचा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली होती नरसिंगची बाजू....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...