डाेपिंगचा दंश : / डाेपिंगचा दंश : ‘नाडा’ची सुनावणी स्थगित; नरसिंगचे भविष्य आज ठरणार

वृत्तसंस्था

Jul 28,2016 05:18:00 AM IST
नवी दिल्ली/सोनीपत - रिओ ऑलिम्पिकसाठी निवडण्यात आलेला मल्ल नरसिंग यादवच्या अडचणी अजून संपलेल्या नाहीत. त्याने राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीसमोर (नाडा) आपली बाजू मांडली. साडेतीन तासानंतर सुनावणी स्थगित करण्यात आली. गुरुवारी सुनावणी सुरू राहणार असून यानंतर सायंकाळी याप्रकरणी निर्णय येण्याची शक्यता आहे. नरसिंग सायंकाळी चार वाजता नाडा कार्यालयात पोहोचला. त्याच्यासेाबत वकिलांची टीम होती. नरसिंग नाडाला पोहोचताच समर्थकांनी त्याच्या बाजूने नारेबाजी केली. नरसिंग येण्याच्या दोन तास आधीपासूनच त्याचे समर्थक आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हजर होते.
नरसिंग समर्थकांनी “नरसिंग भाई जिंदाबाद’, “नरसिंग तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’, “नरसिंगला न्याय आणि दोषींना शिक्षा द्या, सीबीआय चौकशी करा,’ असे नारे लागले. यानंतर सुनावणी सुरू झाली. मात्र, कसलाच निकाल आला नाही.

दुसऱ्याडोप चाचणीतही नरसिंग यादव झाला फेल
नरसिंगचेजुलै रोजी दुसरी डोपिंग चाचणी झाली. नाडाने दिलेल्या माहितीनुसार याचे नमुनेसुद्धा पॉझिटिव्ह आले आहेत. याआधी २५ जून रोजी झालेल्या पहिल्या डोप चाचणीत तो फेल झाला होता.

बंदी असलेले औषध नाही : नरसिंगच्याफूड सप्लिमेंटमध्ये कोणतेही बंदी असलेले औषध मिसळण्यात आले नसल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे नरसिंगने केलेला फूड सप्लिमेंटमधील भेसळीचा दावा चुकीचा ठरला.

नरसिंगवरबंदीची घोषणा : नरसिंगप्रकरणाला गंभीरतेने घेताना जागतिक कुस्ती संघटनेने (यूडब्ल्यूडब्ल्यू) प्रसिद्धिपत्रक जाहीर करून म्हटले की, “लास वेगासमध्ये २०१५ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देशाला ऑलिम्पिक कोटा मिळवून देणाऱ्या नरसिंग यादवला भारतीय ऑलिम्पिक संघटनेने अस्थायी स्वरूपात निलंबित केले आहे. त्याच्यावर रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे.’
दरम्यान, नरसिंग यादवने सोनिपत पोलिस स्टेशनमध्ये आपल्याविरुद्ध षड््यंत्र रचण्यात आल्याचा आरोप करताना शिबिरातील खेळाडूंविरुद्ध तक्रार केली आहे.
नरसिंगने अंडर-१६ गटातील मल्ल जितेशवर जेवणात औषध टाकल्याचा आरोप केला आहे. जितेशचा मोठा भाऊ सुशीलकुमारसोबत कुस्तीचा सराव करायचा, अशी माहिती आहे. हे प्रकरण अधिक गंभीर होत असल्याचे दिसत आहे.

ज्युनियर मल्लावर आरोप; आरोपीची ओळख पटली
भारतीयकुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंग यांनी म्हटले की, सोनिपत शिबिरात नरसिंग यादवच्या जेवणात औषधीची भेसळ करणाऱ्या आरोपीची ओळख पटली आहे. पोलिस चौकशीनंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.

शरीर लवकर औषधमुक्त होणे कठीण
नाडाच्याचाचणीत नरसिंगच्या आणि दोन्ही नमुन्यांत बंदी असलेले मेंथेडाइनोन नावाचे औषध सापडले आहे. जेवणातून एखाद्याने है औषध दिले असावे, असा आरोप नरसिंगचा आहे. नरसिंगचे प्रकरण अत्यंत जटिल आहे. नरसिंगविरुद्ध षड््यंत्र झाल्याचे नाडाने मान्य केले तरीही तो रिओ ऑलिम्पिकला जाऊ शकणार नाही. कारण बंदी असलेले औषध त्याच्या शरीरात आहे. त्याचे शरीर औषधमुक्त होत नाही, तोपर्यंत तो खेळू शकणार नाही.

नरसिंगच्या जागी प्रवीण राणा जाणार ?
डोपिंग चाचणीत अडकलेला मल्ल नरसिंग यादवच्या जागी रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रवीणकुमार राणा भारताचे प्रतिनिधित्व करू शकतो. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) आंतरराष्ट्रीय कुस्ती फेडरेशनकडे (यूडब्ल्यूडब्ल्यू) नरसिंगच्या जागी प्रवीणचा संघात समावेश करण्याची परवानगी मागितली होती. ती मान्य झाली आहे. २३ वर्षीय प्रवीण ७४ किलो वजन गटात खेळेल. यूडब्ल्यूडब्ल्यूच्या अधिकृत संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार नरसिंग क्वालिफिकेशन इव्हेंटच्या बाहेर झालेल्या डोप चाचणीत फेल झाला होता.
X
COMMENT