आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Baseball Competition In Solapur On 28 November

28 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद बेसबॉल स्पर्धा सोलापुरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- येत्या 28 नोव्हेंबरपासून 28 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद बेसबॉल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा 28 नोव्हेंबर ते दोन डिसेंबरदरम्यान सोलापूर येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर पुरुष गटाची तर रेल्वे मैदानावर महिला गटाची स्पर्धा होणार असल्याची माहिती स्पर्धा सचिव प्राध्यापक संतोष खेंडे यांनी दिली. स्पर्धेत पुरुषांचे 22 व महिलांचे 20 राज्याचे संघ असे 850 खेळाडू, पंच व पदाधिकारी भाग घेतील. सोलापुरात होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सांगली येथे आठ ते 10 नोव्हेंबरदरम्यान होणार्‍या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून महाराष्ट्राचे संघ निवडण्यात येणार आहेत. संघाचे सराव शिबिरही सोलापुरात 20 ते 27 नोव्हेंबरपर्यंत होईल.

सोलापूरची कामगिरी
सोलापूरने राज्यात प्रथम, तर महिलांनी तृतीय स्थानापर्यंत मजल मारली आहे. त्यातूनच सोलापूरच्या चांदणी मोटेने महाराष्ट्र संघातून प्रतिनिधित्व करताना बेस्ट कॅचरचे पारितोषिक पटकावले. सुजाता चव्हाण व ऐश्वर्या कल्याणशेट्टी यांची भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड झाली.
अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ
बेसबॉल हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ आहे. एका संघात 16 खेळाडू असतात. त्यातील नऊ प्रत्यक्षात खेळतात. यात सर्वांना फलंदाजी मिळते. पाच डावांचा हा सामना असतो. तीन गडी बाद झाल्यावर एक डाव संपतो.