Home »Sports »From The Field» National Desert Storm Car Rally In Aurangabad

राष्ट्रीय डेझर्ट स्टॉर्म कार रॅली स्पध्रेत प्रमोद-अमित जोडी दुसर्‍या स्थानी

क्रीडा प्रतिनिधी | Feb 24, 2013, 07:57 AM IST

  • राष्ट्रीय डेझर्ट स्टॉर्म कार रॅली स्पध्रेत प्रमोद-अमित जोडी दुसर्‍या स्थानी

औरंगाबाद - औरंगाबादचे गुणवंत खेळाडू, कारचालक प्रमोद राठोड आणि अमित कुलकर्णी या जोडीने जबरदस्त कामगिरी करताना मारुती सुझुकी राष्ट्रीय डेझर्ट स्टॉर्म कार रॅली स्पर्धेत (एक्स्ट्रीम प्रकार) दुसरे स्थान पटकावले आहे. मराठवाड्यासारख्या मागास भागातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार रॅली स्पध्रेत बाजी मारणे हे मोठे यश असून प्रमोद आणि अमितच्या जोडीने यापूर्वी 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय हिमालयीन कार रॅलीत द्वितीय क्रमांक मिळवला होता.

करण-विक्रम प्रथम

चंदीगडचे व्यावसायिक चालक करण जुंग आणि विक्रम शर्मा यांनी स्पध्रेत अव्वल क्रमांक पटकावला. विजेती जोडी दुसर्‍या क्रमांकावरील प्रमोद राठोड आणि अमित कुलकर्णी यांच्यापेक्षा जवळपास 14 ते 15 मिनिटांनी पुढे होती. हिरेन उपाध्याय आणि जयदीप सेठी यांनी तिसरे स्थान मिळवले. विशेष म्हणजे प्रथम आणि तिसर्‍या क्रमांकावर येणारे कार रॅलीतील व्यावसायिक खेळाडू आहेत, तर प्रमोद-अमित हे हौशी खेळाडू आहेत. छंद म्हणून स्पध्रेत सहभागी झालोत आणि दुसरे स्थान मिळवले, अशी बोलकी प्रतिक्रिया अमित कुलकर्णीने व्यक्त केली.

सकाळी 3 वाजता स्पध्रेला झाली सुरुवात

या स्पध्रेला सकाळी मध्यरात्री 3 वाजता सुरुवात झाली. अखेरच्या दिवशी प्रमोद-अमित यांनी बिकानेर ते जयपूरदरम्यान 510 कि.मी.चे अंतर पार केले. खडतर वाळवंटातून त्यांनी मार्गक्रमण केले. सकाळी स्पध्रेला सुरुवात झाली त्या वेळी मुसळधार पाऊस सुरू होता. खाली वाळवंट आणि वरती पाऊस, अशा संकटमय, प्रतिकूल परिस्थितीत प्रमोद-अमित यांनी कार चालवून यश मिळवले. काहीही झाले तरीही अखेरपर्यंत स्पध्रेत टिकून राहण्याचे आव्हान या दोघांसमोर होते. हार मानायची नाही. या एका निग्रहाने या दोघांनी दुसरे स्थान मिळवले. सहा दिवस चाललेल्या या स्पध्रेत देशभरातून 60 गाड्या आणि 120 खेळाडू सहभागी झाले होते. यात औरंगाबादच्या प्रमोद राठोड-अमित कुलकर्णी यांनी दुसरे स्थान मिळवले.

मोटर स्पोर्टला वाढवायचे आहे
राष्ट्रीय डेझर्ट स्टॉर्म स्पध्रेत दुसरे स्थान मिळवून खूप आनंद झाला आहे. हे दोघे कुठून आले, असे अनेकजण आमच्याबद्दल बोलत होते. मराठवाड्याचे नाव आम्ही राष्ट्रीय पातळीवर झळकावले, याचा अभिमान आहे. आता जिल्ह्यात, मराठवाड्यात मोटार स्पोर्ट खेळ वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न करेन. - प्रमोद राठोड.

Next Article

Recommended