आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय स्पर्धा : महाराष्ट्र संघ एकूण ८० पदकांसह दुसर्‍या स्थानी; २५ सुवर्णपदके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवनंतपुरम - महाराष्ट्र संघाने ३५ व्या राष्ट्रीय स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवला. स्पर्धेच्या सातव्या दिवशी ८६ पदकांसह पदकतालिकेत दुसर्‍या स्थानावर धडक मारली. यात २६ सुवर्णांसह ३४ रौप्य आणि २६ कांस्यपदकांचा समावेश आहे. महाराष्ट्राने सायकलिंग प्रकारात पदकाचे खाते उघडले. अरविंद पानवरने महाराष्ट्र संघाला रौप्यपदक मिळवून दिले.

नेमबाजी : महाराष्ट्राला कांस्यपदक
महाराष्ट्राच्या नेमबाज संघाने शनिवारी कांस्यपदक पटकावले. या संघाने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकाराच्या सांघिक गटात ही कामगिरी साधली. शिवराज सासे, रोनक पंडित आणि अक्षय अष्टपुत्रेने महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवून दिले. या तिघांनी १६८२ गुणांसह तिसरे स्थान गाठले. यात एसएससीबीने सुवर्णपदक व हरियाणाने रौप्यपदक पटकावले.

शिवराज सासे कांस्यपदकाचा मानकरी
महाराष्ट्राचा युवा नेमबाज शिवराज सासेने कांस्यपदकावर नाव कोरले. त्याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात पदक पटकावले. शिवराजने अंतिम फेरीत १९ गुणांची कमाई केली. यासह त्याने तिसर्‍या स्थानावर धडक मारली. त्याने सांघिकसह वैयक्तिक गटातही पदकाची कमाई करून दुहेरी यश संपादन केले.

जलतरण : अपूर्वाला रौप्यपदक
महाराष्ट्राची युवा जलतरणपटू मोनिक गांधीने रौप्यपदक पटकावले. तिने महिलांच्या १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात ही कामगिरी केली. यासह तिने संघाला रौप्यपदक मिळवून दिले.

महिलांना कांस्य
तिरंदाजी प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंचा दबदबा कायम राहिला. महिला संघाने सांघिक गटात कांस्यपदकावर नाव कोरले. तिसर्‍या स्थानासाठीच्या लढतीत महाराष्ट्राने २०२ गुणांची कमाई केली. एकता शिर्केच्या नेतृत्वात महाराष्ट्राने तिसरे स्थान पटकावले. यात स्नेहल मंधारे, रूपाली यमगर आणि दीक्षा रोडेने चमकदार कामगिरी केली.

नेमबाजी : शीतल थोरात चौथ्या स्थानावर
महाराष्ट्राच्या शीतल थोरातने नेमबाजी प्रकारात चौथ्या स्थानावर धडक मारली. तिने महिलांच्या १० मीटर पिस्तूल प्रकारात हे यश संपादन केले. शीतलने या गटाच्या अंतिम फेरीत १५७.८ गुणांची कमाई केली. भारताची नंबर वन हिना सिद्धू चॅम्पियन ठरली. तिने २००.८ गुणांसह अव्वल स्थान गाठले. मलाइका गोयलने रौप्य व अनू राज सिंगने कांस्यपदकावर नाव कोरले.

एकताला सुवर्ण
महाराष्ट्राची युवा तिरंदाज एकता शिर्के स्पर्धेत चॅम्पियन ठरली. तिने वैयक्तिक गटात सुवर्ण पटकावले. तिने अंतिम फेरीत ६ गुणांसह हे सोनेरी यश संपादन केले. या गटात मणिपूरची नाओबी चानूने रौप्यपदक जिंकले.

अरविंदला रौप्यपदक
अरविंद पानवरने ३६ किमी अंतराच्या रेसमध्ये दुसरे स्थान पटकावले. त्याने ५५:२८.३७३ सेकंदांत निश्चित अंतर पूर्ण केले. यासह महाराष्ट्राचा युवा खेळाडू अरविंद रौप्यपदकाचा मानकरी ठरला.