Home | Sports | Other Sports | national games medal winner maharashtraian player get prize

महाराष्ट्राच्या विजेत्या खेळाडूंना १५ दिवसांत पारितोषिके

Agency | Update - Jun 01, 2011, 12:35 PM IST

रांची येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राच्या विजयी खेळाडूंना सुवर्णपदकासाठी ५ लाख रुपये, रौप्यपदकासाठी ३ लाख रुपये व ब्राँझपदकासाठी १.५ लाख रुपये अशी रोख पारितोषिके १ ते १५ दिवसांत देण्यात येतील.

 • national games medal winner maharashtraian player get prize

  मुंबई - रांची येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राच्या विजयी खेळाडूंना सुवर्णपदकासाठी ५ लाख रुपये, रौप्यपदकासाठी ३ लाख रुपये व ब्राँझपदकासाठी १.५ लाख रुपये अशी रोख पारितोषिके १ ते १५ दिवसांत देण्यात येतील. त्याचप्रमाणे राज्याचे नवीन क्रीडा धोरण तांत्रिक बाबी पूर्ण करून लवकर विधिमंडळात मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्राचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी आज येथे आपल्या जनता दरबारात दिले.

  महाराष्ट्र ऑलिम्पिक संस्थेचे सरचिटणीस बालासाहेब लांडगे, सहसचिव प्रल्हाद सावंत, सहसचिव प्रकाश तळपुळे, कार्यकारिणी सदस्य दयानंद कुमार, अर्जुन पारितोषिक विजेत्या मोनिका नाथ, पंकज शिरसाठ, शिळा कुरेशी, होमियार मिस्त्री, वैशाली उपाध्ये, महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघटनेचे सरचिटणीस महेंद्र चेंबूरकर आदी विविध क्रीडा क्षेत्रातील मंडळींनी आपली निवेदने सादर केली.

  - येत्या १५ दिवसांत क्रीडा धोरणाच्या मान्यतेसाठी प्रयत्न
  - खेळाडूंना तातडीने बक्षीस देण्यावर क्रीडामंत्र्यांचा भर
  - आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळविणाऱ्यांना थेट नौकरी
  - शिवछत्रपती पुरस्काराच्या नियमावलीसाठी लवकरच समिती

Trending