आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National Payaka Wrestling Tournament At Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रीय पायका कुस्ती स्पर्धा आजपासून औरंगाबादमध्‍ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) येथे पंचायत युवा क्रीडा व खेल अभियानांतर्गत सहाव्या स्वामी विवेकानंद पायका बास्केटबॉल आणि कुस्ती स्पध्रेचे 16 ते 19 फेब्रुवारीदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. स्पध्रेत एकूण 700 खेळाडू, पंच, अधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती साईचे सहायक संचालक वीरेंद्र भंडारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धा 16 वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात खेळवली जाईल. या स्पध्रेतील विजेत्यांना राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्ती, प्रमाणपत्र आणि साहित्य बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंना साईमध्ये थेट प्रवेश देण्यात येणार आहे. स्पध्रेचे उद्घाटन सकाळी 10 वाजता होणार असून याप्रसंगी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर कला ओझा, मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, साईचे संचालक रूपकुमार नायडू आणि उद्योजक समीर मुळे यांची उपस्थिती राहणार आहे.