आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Shooting Competition: Teshwini Get Bronz , Rajendra Gold

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा: तेजस्विनीला कांस्यपदक; राजेंद्रला सुवर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शिवछत्रपती पुरस्कार विजेती तेजस्विनी मुळेने ५८ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेच्या सांघिक गटात रेल्वेला कांस्यपदक मिळवून दिले. रेल्वेने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात तिसरे स्थान पटकावले. औरंगाबादच्या तेजस्विनी मुळेसह रुचिरा आणि अनुजा जंगने रेल्वेकडून चमकदार कामगिरी केली. या गटात महाराष्ट्राने सुवर्णपदकाची कमाई केली. तेजस्विनी सावंत, दीपाली देशपांडे आणि प्रियाल केनीने १८३७ गुणांची कमाई करताना यजमानांना सुवर्णपदक मिळवून दिले. हरियाणा संघ रौप्यपदकाचा मानकरी ठरला. तेजस्विनी सावंतने स्पर्धेत गोल्डचा डबल धमाका उडवला. तिने वैयक्तिक आणि सांघिक गटात सुवर्णपदकाची कमाई केली.

राजेंद्रला दोन पदके
औरंगाबादचा युवा नेमबाज राजेंद्र बागूलने सुवर्णपदकावर नाव कोरले. तसेच त्याने एका कांस्यपदकाची कमाई केली. त्याने ५० मीटर पिस्तूल सिव्हिलियन प्रकारात संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने रुचित कापडिया आणि सुमेध देवसोबत चमकदार यश संपादन केले. तसेच १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात वैयक्तिक कांस्यपदक मिळवले.