आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिक्सिंगविरुद्ध कडक कायद्याची गरज : किरमाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजांना रोखण्यासाठी कडक कायद्याची आवश्यकता आहे. आयपीएलला बंद करणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया माजी कसोटीपटू सय्यद किरमाणी यांनी दिली.‘सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगचे आरोप क्रिकेटपटूंवर लागणे हे फार लाजिरवाणे आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. यासारख्या
वाइट गोष्टी थांबवण्यासाठी आता कडक व ठोस अशा कायद्याची आवश्यकता आहे. मात्र, आयपीएलसह क्रिकेटच्या कोणत्याही स्वरूपाला थांबवले जाऊ शकत नाही,’ असेही ते म्हणाले.


तिन्ही फॉरमॅटमधील क्रिकेट हे सुरू राहणार आहे. यामध्ये चौथ्या स्वरूपाच्या क्रिकेटचाही समावेश होऊ शकेल. सट्टेबाजी आणि फिक्सिंगमध्ये क्रिकेटपटूंचा समावेश हे लाजिरवाणे आहे. यामध्ये सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर त्यांनी संताप व्यक्त केला.