आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादापुढे झुकल्या नीता अंबानी... अनमोल हिर्‍याला मुकणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयपीएल-6 ला एप्रिल महिन्यात सुरूवात होणार आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकरची टीम मुंबई इंडियन्सची मालकीण नीता अंबानी यांना त्यांच्या अनमोल हिर्‍याला मुकावे लागणार आहे. दक्षिण भारतात श्रीलंकेच्या खेळाडूंना होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर त्यांनीही बीसीसीआयच्या आदेशाचे पालन करू असे म्हटले आहे.

श्रीलंकेचा खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा स्टार फास्ट बॉलर लसिथ मलिंगा त्यांच्यासाठी मॅच विनर राहिलेला आहे. मात्र, तामिळनाडूमध्ये होत असलेल्या विरोधामुळे श्रीलंकेचे खेळाडू आयपीएल-6 मध्ये खेळाणार नाहीत. त्यामुळे मुंबई इंडियन्सला यंदा त्याच्या शिवाय खेळावे लागणार आहे.

श्रीलंकेच्या खेळाडूंच्या समावेशाबद्दल मुंबईच्या फ्रेंचाईजीला अद्याप बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत सुचना देण्यात आलेल्या नाही.

अंबानी म्हणाल्या, बीसीसीआय लवकरच या वादावर काही तोडगा काढेल याचा आम्हाला विश्वास आहे. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असणार आहे.

आयपीएलच्या इतिहासात विकेट टेकर बॉलर म्हणून मलिंगाची ख्याती राहिली आहे. मुंबई इंडियन्सचा तो हुकमाचा एक्का राहिला आहे. मलिंगाने 2009 ते 2012 पर्यंत आयपीएलच्या 56 मॅचेसमध्ये 16.63 च्या सरासरीने सर्वाधिक 83 विकेट घेतल्या आहेत. त्याचा बेस्ट परफॉर्मन्स केवळ 13 रन्स देत 5 विकेट घेण्याचा राहिला आहे. आयपीएलच्या या सीजनमध्ये श्रीलंकेचे 13 खेळाडू विविध टीममध्ये खेळणार होते.