आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nelson Mandela Dies At 95, Cricketers Pay Tribute To Nelson Mandela

मंडेलांच्‍या‍ निधनामुळे क्रिकेटपटू शोकाकूल, अ‍ॅशेज सामन्‍यापूर्वी झाले भावूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅडिलेड- दक्षिण आफ्रिकेचे दिग्‍गज नेते आणि शांतीदूत नेल्‍सन मंडेला यांचे आज निधन झाले. खेळाप्रती जागरूक असलेले मंडेला मात्र आपल्‍या आयुष्‍याचे शतक पूर्ण करू शकले नाहीत. 95व्‍या वर्षी त्‍यांनी या जगाला निरोप दिला.

मंडेला यांच्‍या निधनामुळे संपूण जग शोकात बुडाले आहे. ते फक्‍त दक्षिण आफ्रिकेपुरतेच मर्यादित नव्‍हते. भारतरत्‍न पुरस्‍काराने सन्‍मानित मंडेलांना खेळाप्रती आवड होती. खेळाच्‍या माध्‍यमातूनच देशाचा विकास होऊ शकते, असे ते म्‍हणायचे. खेळामुळे एकजुटीने काम करण्‍याची प्रेरणा मिळते. दक्षिण आफ्रिकेला वर्णद्वेषातून बाहेर काढण्‍यामध्‍ये मंडेलांचे मोठे योगदान होते.

त्‍यांना क्रिकेट विश्‍वातही श्रद्धांजली वाहण्‍यात आली. ऑस्‍ट्रेलियात अ‍ॅडिलेड येथे होत असलेल्‍या अ‍ॅशेज कसोटीच्‍या दुस-या दिवशीचा खेळ सुरू होण्‍यापूर्वी सर्व खेळाडूंनी एक मिनिटासाठी मौन राखले. त्‍यांनी हातावर काळी पट्टी बांधून आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा मंडेलांना खेळाडूंनी कशी वाहिली श्रद्धांजली...