आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल सामना: नेमार, ऑस्करच्या गोलने ब्राझीलची कोरियावर मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल - ब्राझील संघाने रविवारी आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात दक्षिण कोरियावर 2-0 अशा फरकाने मात केली. नेमार (44 मि.) आणि ऑस्कर (49 मि.) यांनी गोल करून संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

सेऊल येथील वर्ल्डकप स्टेडियमवर ब्राझील आणि दक्षिण कोरिया यांच्यात रंगतदार लढत झाली. मात्र, ब्राझीलला सामन्यात गोलचे खाते उघडण्यासाठी तब्बल 44 व्या मिनिटांपर्यंत झुंज द्यावी लागली. अखेर नेमारने ब्राझीलकडून पहिला गोल केला. त्यानंतर अवघ्या चार मिनिटांत चेल्सीच्या ऑस्करने गोल केला. या गोलच्या बळावर ब्राझीलने 49 व्या मिनिटाला सामन्यात 2-0 अशा फरकाने मजबूत आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत ब्राझीलने सामन्यात दक्षिण कोरियाचा पराभव केला.
येत्या गुरुवारी ब्राझीलचा मैत्रीपूर्ण सामना झाम्बियाशी होणार आहे, तर दक्षिण कोरियाची गाठ चिलीशी पडेल.