तिरुवनंतपुरम - केरळमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी महाराष्ट्राच्या मयूरेश पवार या १९ वर्षीय नेटबॉल खेळाडूचा सोमवारी मृत्यू झाला. मयूरेश हा सातारा जिल्ह्यातील मायनीचा रहिवासी होता. इस्लामपुरात तो अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकत होता. आधी हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले होते. मात्र बुडाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले.
शवविच्छेदनानंतर त्याचे पार्थिव संघ कुटुंबीयांकडे सोपवले जाणार असल्याची माहिती स्पर्धेच्या अधिकाऱ्यांनी दिली. केरळचे क्रीडामंत्री टी. राधाकृष्णन यांनी मयुरेशच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्याचे पार्थिव महाराष्ट्रात पाठवण्याचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे जाहीर केले आहे.