आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा वाद: आयपीएल-८ मध्ये २ नवे संघ दिसणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएलमध्ये सट्टेबाजी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे स्पर्धेतील अस्तित्व संकटात आले आहे. या संघांची मान्यता कायम राहील की संपुष्टात येईल? याचा निर्णय न्यायालयाकडून गठित समिती घेईल. दरम्यान, गरज पडल्यास दोन नव्या संघांचा समावेश केला जाईल, असे आयपीएलचे चेअरमन रंजीब बिस्वाल यांनी स्पष्ट केले.

नव्या संघांच्या प्रश्नाबाबत बिस्वाल यांनी 'क्रिकइन्फो' या संकेतस्थळाला म्हटले की, 'आम्ही यावर विचार करीत आहोत. यात आम्हाला कसलीच अडचण नाही. मात्र, स्पर्धेचे आयोजन उशिरा झाल्यास कमर्शियल पार्टनरची अडचण होणार नाही, हेसुद्धा बघावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाची समिती फ्रँचायझीसोबत गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांच्यावर कार्य निर्णय घेते, याकडे सध्या बीसीसीआयचे लक्ष असेल.' माजी मुख्य न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाने तीनसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. बिस्वाल यांच्या माहितीनुसार स्पर्धेला ८ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. याबाबत पुढचा निर्णय बीसीसीआयच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत होईल. फ्रँचायझी संघांना फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यापर्यंत माहिती दिली जाईल. एका फ्रँचायझी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, 'चौकशी समिती काय निर्णय घेईल, याची आम्हाला चिंता आहे.

आयपीएलचा भाव घसरला
अमेरिकन अॅप्रेजलच्या माहितीनुसार वाढत्या वादामुळे आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूत जवळजवळ ५०० कोटी रुपयांची घसरण झाली आहे. गतवर्षी याची व्हॅल्यू ३.२ बिलियन डॉलर होती, तर ब्रँड फायनन्सने २०१० मध्ये ब्रँड व्हॅल्यू ४.१३ बिलियन डॉलर असल्याचे स्पष्ट केले होते.
दोन संघांचे ३३ खेळाडू : लीगमध्ये चेन्नईचे १४ व राजस्थान संघाचे १९ खेळाडू आहेत. चेन्नईचे १०.३, राजस्थानला ३.९१ लाख टि्वटरवर फॉलोअर आहेत.
दालमिया होऊ शकतात बीसीसीआय अध्यक्ष
एन. श्रीनिवासनची बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरील हकालपट्टी जवळजवळ निश्चितच आहे. चेन्नई सुपरकिंग्जचे मालकी हक्क सोडले तरीही शक्यतो ते अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात. कारण, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांना होणा-या विरोधात वाढ होईल. श्रीनिवासन यांच्या जागी विराजमान होण्यासाठी जगमोहन दालमिया हे प्रबळ दावेदार आहेत, असे म्हटले जात आहे. त्यांना दक्षिणेतील क्रिकेट संघाचेही समर्थन मिळू शकते.
‘श्रीनि यांनी आयसीसीचे पद सोडून द्यावे. देशालाच त्यांची गरज नाही. त्यामुळे ते या पदावर कसे राहू शकतात? सहा वर्षांपासून मी यासाठी लढा देत आहे. यातून बीसीसीआयमध्ये बदल होणार आहे.
एसी मुथय्या, माजी अध्यक्ष

‘भारतीय क्रिकेटसाठी हा दु:खदायी दिवस आहे. दुर्दैवाने समाधानासाठी यात सर्वोच्च न्यायालयाला यावे लागले. माहिती अधिकार स्वीकारण्याची बीसीसीआयसाठी हीच योग्य वेळ आहे. बिशनसिंग बेदी, माजी कर्णधार

सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निर्वाळा आहे. या निर्णयाने बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. पहिल्यांदाच मंडळाच्या सर्वच अधिका-यांना न्यायालयात उभे राहावे लागले.
आय. एस. बिंद्रा
पुढे वाचा श्रीनि बाहेर गेल्याने मी आनंदात : पवार