आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू अजंटा स्टीलला विजेतेपद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मौलाना आझाद महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत न्यू अजंटा स्टील संघ चॅम्पियन ठरला. बुधवारी झालेल्या अंतिम सामन्यात अबुबकर पटेलच्या (50 धावा, 3 बळी) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर अजंटाने मिसाम नाइट रायडर्सवर 6 गडी राखून मात केली.
प्रथम फलंदाजी करणार्‍यामिसामने 8 बाद 119 धावा काढल्या. प्रत्युत्तरात अजंटाने 4 गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. सलामीवीर अबुबकर पटेलने 47 धावांत शानदार 50 धावा काढल्या. शोएब सिद्दिकीने महत्त्वपूर्ण 28 धावा केल्या. सय्यद नुरूलने 23 चेंडूंत नाबाद 35 आणि सचिन शेळकेने नाबाद 9 धावांचे योगदान दिले. मिसामच्या सय्यद सर्फराजने 2 बळी घेतले. तत्पूर्वी मिसामतर्फे जे. गंगवालने 30, शेख परवेझ 32, यशवंत 13 आणि सय्यद सर्फराजने 12 धावा काढल्या. अजंटाच्या अबुबकर पटेलने 4 षटकांत 18 धावा देत 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. अकिब जावेद आणि अंकित अंबेपवारने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
उत्कृष्ट खेळाडू
फलंदाज - शेख शारेक (220 धावा)
गोलंदाज - अकिब जावेद (18 बळी)
यष्टिरक्षक - अबुबकर पटेल (15 झेल)
मालिकावीर - अबुबकर पटेल (260 धावा, 10 बळी)
विशेष खेळाडू -इम्रान पटेल (140 धावा, 7 बळी)