आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • New Hevan Open Tenis: Sania Mirza Zeng Zeu Won Double

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यू हेवन ओपन टेनिस: सानिया मिर्झा-झेंग झेईने पटकावले महिला दुहेरीचे विजेतेपद !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यू हेवन - भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने आपली नवी सहकारी चीनची खेळाडू झेंग झेईसोबत रविवारी न्यू हेवन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचा किताब पटकावला. या तिस-या मानांकित जोडीने महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात अनाबेल मेडिना गारिग्वेज-कॅटरिना सरेबोटनिकला पराभूत केले.


सानिया-झेंगने 6-3, 6-4 अशा फरकाने फायनलमध्ये विजय मिळवला. सानियाचे हे यंदाच्या सत्रातील तिसरे विजेतेपद ठरले. तसेच करिअरमधील 17 वा किताब ठरला. सानिया व झेंग या स्पर्धेत प्रथमच महिला दुहेरीत सोबत खेळल्या. यापूर्वी, सानियाने अमेरिकेची बेथानी माटेक-सॅन्डसोबत यावर्षात महिला दुहेरीचे दोन किताब पटकावले.


चीनच्या झेंगचे हे या वर्षातील पहिले विजेतेपद ठरले. या स्पर्धेतील विजयासह तिने करिअरमधील 15 वे विजेतेपद मिळवले. तिस-या मानांकित सानिया-झेंगने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये 3-3 ने बरोबरी घेतली. त्यानंतर या जोडीने जबरदस्त पुनरागमन करत आघाडी घेतली आणि पहिला सेट जिंकला. त्यांनी सहज दुसरा सेट जिंकून चषक आपल्या नावे केला. ‘स्पर्धेत आमची निराशाजनक सुरुवात झाली होती. मात्र, आता आम्ही चांगली खेळी करत आहोत. फायनलमधील कामगिरीचा अनुभव फार चांगला आहे,’ असे सानियाने म्हटले.


हालेपची क्वितोवावर मात
रोमानियाची सिमोना हालेपने न्यू हेवन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा किताब जिंकला. तिने माजी विम्बल्डन चॅम्पियन पेत्रा क्वितोवाला सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. तिने 6-2, 6-2 अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. जागतिक क्रमवारीत 21 व्या स्थानी असलेल्या हालेपने अवघ्या 66 मिनिटात चषकावर नाव कोरले.