आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नवीन नियमांमुळे विश्वचषक अधिक औत्सुक्याचा ठरेल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एकदिवसीय सामन्यांमध्ये करण्यात आलेल्या अभिनव बदलांमुळे यंदाचा ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये हाेत असलेला विश्वचषक आक्रमकतेने खेळला जाण्याची शक्यता आहे. याने तो अधिक औत्सुक्यपूर्ण ठरेल, असे मत भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले आहे. या वेळी करण्यात आलेल्या नवीन नियमांमुळे कर्णधाराला कामचलाऊ
गोलंदाजांवर भरवसा ठेवता येणार नाही. यात त्यांना संघात ५ आक्रमक गोलंदाजांची निवड करणे अपरिहार्य ठरणार आहे, असेही नियमात स्पष्ट करण्यात आले.

‘ईएसपीएन क्रिकइन्फो’शी बोलताना राहुल द्रविडने प्रत्येक संघाला संपूर्ण सामन्यात किमान पाच खेळाडू पूर्णवेळ ३० यार्डच्या आत ठेवण्याचा करण्यात आलेला नियम खूप परिणामकारक ठरणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सर्व संघांना यंदाच्या विश्वचषकात पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीनेच उतरावे लागणार असल्याचेही राहुल द्रविडने नमूद केले. नवीन चेंडूने
दुस-या टप्प्यात गोलंदाजी अवघड होईल, असे भारताच्या या माजी खेळाडूला वाटते.