आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

World Cup च्या उत्साहात रंग भरणार 6 नवे RULES, कॅप्टनच्या अडचणी वाढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा काऊंटडाऊन जसजसा पुढे सरकत आहे, त्याच वेगाने क्रिकेट फॅन्सचा उत्साहदेखिल वाढत आहे. आयसीसीला यावेळी विश्वचषकादरम्यान प्रेक्षकांची संख्या वाढवायची आहे. 1975 पासून 2011 पर्यंत आधीच विश्वचषकातील प्रेक्षकांची संख्या वाढली आहे. पण आयसीसीला त्यात आणखी वाढ व्हावी म्हणून आयसीसीने कंबर कसली आहे. गेल्या सर्व विश्वचषकांच्या तुलनेत ही स्पर्धा अधिक रोमांचक व्हावी यासाठीही तयारी केली आहे.

त्यसाठी वन डे सामने अधिकाधिक रोमांचक व्हावे यासाठी आयसीसीने काही नवे नियम तयार केले आहेत. या विश्वचषक स्परर्धेत ते नियम लागू होणार आहेत. तज्ज्ञांच्या मते या नियमांमुळे क्रिकेटचा हा कुंभमेळा अधिक रंजक ठरणार आहे. या नव्या निवमांमुळे संघांसमोरचे आव्हान वाढणार आहे मात्र प्रेक्षकांसाठी हे नियम अधिक आनंददायी असतील.

नवे नियम असे
14 फेब्रुवारीपासून वन डे सामन्यांमध्ये संपूर्ण डावात 30 यार्डच्या आत पाच क्षेत्ररक्षक ठेवणे गरजेचे असेल.

परिणाम काय होणार?
या नव्या नियमानंतर कर्णधारांवर पाच गोलंदाजांचा संघात समावेश करण्याचा दबाव वाढेल. टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मते कोण्याही कर्णधाराला आता पार्ट टाइम गोलंदाजांवर वेळ मारून नेणे महागात पडू शकते. त्यांना आथा वेगळी रणनीती तयार करावी लागेल. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडची मैदाने मोठी-मोठी असल्याने सीमेवर क्षेत्ररक्षक ठेवणे गरजेचे असणार आहे. त्यामुळे आता कर्णधारांना अधिक सजग राहावे लागणार आहे. तर फलंदाजांना अधिक धावा करणे सोपे जाणार आहे.
पुढील स्लइड्सवर पाहा, इतर नवे नियम आणि त्याचे परिणाम...