आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Tenins Organization Protecting Players Business Interest Rohan Bopanna

नव्या टेनिस संघटनेने खेळडूंच्या व्यावसायिक हिताचे रक्षण होईल - रोहन बोपन्‍ना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अखिल भारतीय टेनिस संघ (एआयटीए) नव्याने स्थापन झालेल्या भारतीय टेनिस खेळाडू संघटनेचे (आयटीपीए) स्वागत करेल, अशी आशा स्टार टेनिसपटू रोहन बोपन्नाने व्यक्त केली. या संघटनेच्या माध्यमातून खेळाडूंच्या व्यावसायिक हिताचे रक्षण केले जाईल, असेही तो म्हणाला.
‘एआयटीएने आयटीपीएच्या स्थापनेचे स्वागत करावे, कारण खेळाडूंची एकजूट हे खेळाच्या हिताचे आहे. आयटीपीए ही खेळाडूंनी खेळाडूंसाठी तयार केलेली संघटना आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्री य व राज्य स्तरावर खेळलेल्या 18 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील सर्व खेळाडूंसाठी हे एक व्यासपीठ आहे. ही संघटना भविष्यात युवा खेळाडूंचा शोध घेणे व कामगिरीचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करेल,’ असेही त्याने सांगितले. देशातील काही अव्वल टेनिसपटूंनी आपल्या व्यावसायिक हिताच्या संरक्षणासाठी मागील सोमवारी आयटीपीए स्थापनेची घोषणा केली आहे. ही संघटना एटीपीप्रमाणे काम करेल. खेळाडूंना अडचणी मांडण्यासाठी एक व्यासपीठ देण्यात आले, असे आयटीपीएने स्पष्ट केले.