आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडची लंकेवर २-० ने मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेलिंग्टन - न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर १९३ धावांनी मात करत श्रीलंकेवर २-० असा मालिका विजय मिळवला. मार्च २०१३ मध्ये इंग्लंडला पराभूत केल्यापासून न्यूझीलंडने घरच्या मैदानावर विजयाची घोडदौड अव्याहतपणे सुरूच ठेवली आहे.

मार्क क्रेग याने ५३ धावांमध्ये ४ बळी घेत श्रीलंकेच्या डावाला भगदाड पाडत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. २०१३ पासून न्यूझीलंडने भारत आणि विंडीजलादेखील पराभूत केले आहे. त्यानंतर लंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत माघारी पडूनदेखील न्यूझीलंडने विजयाची नाेंद केली. त्यानंतर दुसरी कसोटीदेखील आरामात जिंकत दहा कसोटी सामन्यांपैकी ७ सामने जिंकण्याचा करिष्मा करून दाखवला.

न्यूझीलंडचा संघ किती परिश्रम घेतोय तेच या विजयातून दिसून येते. सर्वच खेळाडू विजयाचे भुकेले असून एकदिलाने, एकजुटीने सर्व खेळाडू प्रयास करीत असल्यानेच हे यश शक्य झाल्याचे मॅक्लुमने व्यक्त केले.