आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स ट्रॉफी: रोमांचक सामन्यात न्यूझीलंडची श्रीलंकेवर एका गड्याने मात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्डिफ - चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोमांचक सामन्यात न्यूझीलंडने रविवारी श्रीलंकेवर एका विकेटने मात केली. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव 37.5 षटकांत अवघ्या 138 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 36.3 षटकांत नऊ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.


धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून आठव्या क्रमांकाचा फलंदाज नॅथन मॅक्लुमने सर्वाधिक 32 धावा काढल्या. गुप्तिल (25), ब्रेंडन मॅक्लुम (18), आणि टीम साऊथी (13*) संघाला विजय मिळवून दिला. लंकेकडून मलिंगाने दहा षटकांत 34 धावा देत 4 बळी घेतले. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.


तत्पूर्वी, डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल मॅक्कलीनघनच्या (43 धावांत 4 विकेट) घातक गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने श्रीलंकेला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटातील सामन्यात अवघ्या 138 धावांत गुंडाळले. श्रीलंकेकडून यष्टिरक्षक आणि माजी कर्णधार कुमार संगकाराने सर्वाधिक 68 धावा काढल्या. लंकेच्या इतर फलंदाजांनी खेळपट्टीवर फक्त हजेरी लावण्याचे काम केले. संगकारा आठव्या फलंदाजाच्या रूपाने 135 धावांच्या स्कोअरवर बाद झाला. त्याने 87 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार मारले. सलामीवीर तिलकरत्ने दिलशानने 20 आणि तिषारा परेराने 15 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून संगकारा, दिलशान आणि तिषारा परेरा या तिघांनाच दोनअंकी धावसंख्या काढता आली.


मॅक्कलीनघनच्या 4 विकेट
न्यूझीलंडकडून मॅक्कलीनघनने दिलशान, कर्णधार अँग्लो मॅथ्यूज (9), परेरा आणि लसिथ मलिंगा (2) यांना बाद केले. केली मिल्सने कुशल परेरा आणि चांदिमल यांच्या विकेट घेतल्या.


संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : 138 (संगकारा 68, दिलशान 20, तिषारा परेरा 15, 4/43 मॅक्कलीनघन, 2/23 नॅथन मॅक्लुम, 2/14 के. मिल्स)
न्यूझीलंड : 36.3 षटकांत 9 बाद 139 (नॅथन मॅक्लुम 32, साऊथी नाबाद 13)