आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Zealand Have Beaten India In A Test For The First Time Since 2002

एका तपानंतर भारत न्‍यूझीलंडकडून पराभूत, जाणून घ्‍या भारताच्‍या पराभवाचे चार टर्निग पॉईंट...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑकलंड: न्‍यूझीलंड विरुध्‍द भारत यांच्‍यादरम्‍यान सुरु असलेल्‍या कसोटी सामन्‍यामध्‍ये भारताचा 40 धावांनी पराभव झाला. एकदिवसीय मालिका गमावल्‍यानंतर कसोटीमध्‍येही भारताची सुरुवात हाराकिरीनेच झाली आहे. दोन सामन्‍यांच्‍या या मालिकेत न्‍यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

उल्‍लेखनिय बाब म्‍हणजे तब्‍बल 12 वर्षांपूर्वी (2002 ) न्‍यूझीलंडसोबत भारत कसोटीमध्‍ये 10 विकेट्सनी पराभूत झाला होता.कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्‍या नेतृत्‍वाखाली परदेशातील भारताचा 11 वा मोठा पराभव आहे. न्‍यूझीलंड दौ-यामध्‍ये भारत विजयाच्‍या प्रतिक्षेत आहे.

भारतीय संघाने पहिल्‍या कसोटीच्‍या तिस-या दिवशी चांगले प्रदर्शन केले होते, परंतु चौथ्‍या दिवशी भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्‍करली. आणि न्‍यूझीलंडने भारतावर 40 धावांनी रोमहर्षक विजय मि‍ळविला. ४०७ धावांच्या विजयी लक्षाचा पाठलाग करताना भारताला सर्वबाद 336 धावाच करता आल्‍या.

ईडनपार्कच्‍या वेगवान खेळपट्टीवर भारताकडून शिखर धवनने चांगली खेळी करुन विजयाचे पारडे भारताच्‍या बाजूने झुकविले होते, परंतु लागोपाठ विकेट पडत गेल्‍याने न्‍यूझीलंडने भारतावर निसटता विजय प्राप्‍त केला.

पुढील स्‍लाइडवर, खेळातील चार टर्निग पॉईंट ज्‍यामुळे भारताला हार पत्‍कारावी लागली.