आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्तिलची विक्रमी खेळी; न्यूझीलंडने जिंकली वन डे मालिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साउथम्पटन- मार्टिन गुप्तिलच्या विक्रमी 189 धावांच्या बळावर न्यूझीलंडने रविवारी दुसर्‍या वनडेत इंग्लंडचा 86 धावांनी पराभव केला. सर्वाधिक 189 धावा काढणारा गुप्तिल हा किवीचा पहिला व जगातील चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. यासह न्यूझीलंडने तीन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली. प्रथम फलंदाजी करताना किवींनी 3 बाद 359 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 44.1 षटकात 273 धावांवर गाशा गुंडाळला.

धावांचा पाठलाग करणार्‍या इंग्लंडच्या जोनाथन ट्रॉटचे (109) नाबाद शतक व्यथ ठरले. इतर फलंदाज किवीच्या गोलंदाजीसमोर अपयशी ठरले. तत्पुर्वी, न्यूझीलंडकडून विल्यमसन (55), टेलर (60) व बी. मॅक्ल्युमने (40*) धावा काढल्या.

सचिन, गावसकरच्या शतकाशी पाँटिंगची बरोबरी
लंडन- ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने प्रथर्मशेणी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर व सुनील गावसकरच्या विक्रमी शतकाशी बरोबरी साधली. त्याने काउंटी क्रिकेट चॅॅम्पियनशिपमध्ये सरे टीमकडून डर्बिशायरविरुद्ध 81 वे शतक झळकावले. यासह त्याने 81 शतकाच्या विक्रमाची बरोबरी केली. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर सरेने सामना जिंकला. प्रथर्मशेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम सर जॅक हॉब्स यांच्या नावे आहे. त्यांच्या नावे एकूण 199 शतके आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला पाँटिंग सरे संघाकडून स्वानच्या जागी खेळला.