आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूझीलंडचा पहिल्या वन डेत इंग्लंडवर विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॅमिल्टन- केन विल्यम्सन (74) व कर्णधार ब्रॅडन मॅक्युलम (69*) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या वन डेत इंग्लंडवर 3 गड्यांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 258 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 7 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा वन डे 20 फेब्रुवारीला नेपियर येथे होईल.

सेडन पार्क मैदानावर इंग्लंडकडून इयान बेल (64), ज्यो रूट (56), जोनाथन ट्रॉट (64) यांनी अर्धशतक झळकावली. मात्र, यांच्या अर्धशतकावर किवीच्या मिशेल मॅक्लीनघन (4/56), जेस फ्रॅकलिंन (3/38), मिल्स (2/32) यांची गोलंदाजी भारी पडली. न्यूझीलंडच्या धारदार गोलंदाजीसमोर इंग्लंड टीम 49.3 षटकात 258 धावांवर भुईसपाट झाली होती. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने विल्यम्सन व मॅकलुमच्या धुव्वाधार फलंदाजीच्या बळावर विजय मिळवला.