आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे : न्यूझीलंड संघाची घोषणा,भारताविरुद्ध येत्या रविवारपासून रंगणार एकदिवसीय मालिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपियर - भारताविरुद्ध आगामी वनडे क्रिकेट मालिकेसाठी न्यूझीलंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील 13 खेळाडूंना संघात कायम ठेवण्यात आले आहे. केवळ राखीव फलंदाज कोलिन मुनरोला हटवण्यात आले आहे. तो आपल्या राज्याच्या संघाकडून खेळेल.
राष्‍ट्रीय निवड समितीचे प्रमुख ब्रुस एडगर यांनी ही माहिती दिली. वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेतील चांगल्या कामगिरीचे खेळाडूंना बक्षीस मिळाले आहे. प्रत्येक खेळाडूने या मालिकेत आपली जबाबदारी पार पाडली. प्रत्येकाने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. यात कोरी अँडरसनने केलेला वनडेतील वेगवान शतकाचा विक्रम महत्त्वपूर्ण आहे, असे त्यांनी म्हटले.
पहिला वनडे 19 रोजी
वनडे मालिकेनंतर होणा-या कसोटीसाठी संघाची घोषणा नंतर केली जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या वनडे सामन्याला रविवारी नेपियर येथे सुरुवात होईल. यानंतर हॅमिल्टन (22 आणि 28 जानेवारी), ऑकलंड (25 जानेवारी), वेलिंग्टन (31 जानेवारी) येथे सामने होतील. दोन्ही कसोटी सामने अनुक्रमे ऑकलंड आणि वेलिंग्टन येथे होतील.
न्यूझीलंडचा वनडे संघ
ब्रेंडन मॅक्लुम (कर्णधार), मार्टिन गुप्तिल, जेसी रायडर, केन विलियम्सन, रॉस टेलर, कोरी अँडरसन, ल्यूक रोंची, जिमी निशाम, नॅथन मॅक्लुम, टीम साऊथी, केली मिल्स, मिशेल मॅकक्लिनगन, अ‍ॅडम मिलान.