आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआय गमावलेली पत पुन्हा मिळवेल?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेट प्रशासनावरील उडालेला विश्वास परत मिळवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कंबर कसली आहे. नऊसूत्री अजेंड्यावर सर्व अधिकारी तसेच राज्य संघटनांची स्वाक्षरी घेण्यात आली. जेणेकरून हितसंबंध जोपासले जाणार नाहीत. या महत्त्वपूर्ण अजेंड्याच्या बळावर गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. खेळ जगतात गेल्या दशकभरात अनेक बदल घडले. प्रशंसक, प्रायोजक, प्रसारक आणि माध्यमांसह सर्वांनीच खेळाला महत्त्व दिले. त्यामुळे खेळ प्रशासनात पारदर्शकता आणि प्रामाणिकतेचा आग्रह धरला जाऊ लागला. बीसीसीआयने २००५ मध्येच स्वहित जोपासले जाऊ न देण्याच्या गोष्टी केल्या होत्या. मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही. २००८ मध्ये एन.श्रीनिवासन खजिनदार असताना त्यांना आयपीएल फ्रँचायझी खरेदीची परवानगी देण्यात आली.

हितसंबंध जोपासण्याचे याहून मोठे उदाहरण असूच शकत नाही. श्रीनिवासन यांनी चेन्नई सुपरकिंग्ज नामक संघ उतरवला. त्याची मालकी इंडिया सिमेंटकडे होती. ही कंपनीही श्रीनिवासन यांचीच. चेन्नईच्या संघाने शानदार कामगिरीने मने जिंकली. मात्र संघाशी संबंधित लोकांवर सामनानिश्चितीचे शिंतोडे उडाले. श्रीनिवासन यांच्यावरील विश्वास हळूहळू उडत गेला. हितसंबंधँपायीच त्यांच्याविरुद्ध एक गट सक्रिय होत गेला. सत्तासंघर्षाच्या या खेळात प्रशंसक आणि प्रायोजकांवर मोठा आघात झाला. लोकांचा क्रिकेटवरचा विश्वासच उडतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. फिफाचे (आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना) उदाहरण याबाबत ज्वलंत ठरावे. फिफाचे अनेक अधिकारी फिक्सिंगमुळे तुरुंगात आहेत. प्रशासनाच्या कुशासनामुळे फुटबॉलची लोकप्रियता घटत आहे. भ्रष्टाचार, लाचखोरी, काळ्या पैशाच्या सुळसुळाटामुळे फिफा प्रायोजकांनी हात वर करण्याची धमकी देऊन टाकली आहे.
फिफात सुधारणेची मागणी जोर पकडत आहे. कोका कोला आणि व्हिसासारख्या (क्रेडिट कार्ड) प्रायोजकांनी फिफाला नाते तोडण्याची धमकी दिली आहे. फिफा अध्यक्ष सॅप ब्लॅटर यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकरण अतिशय क्लिष्ट झाले आहे. किमान क्रिकेटने तरी फुटबॉल राड्यावरून धडा घेऊन शिकावे, सुधरावे.

अजूनही फार काही बिघडले नाही. व्हिसाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स श्राॅफ गेल्या आठवड्यात म्हणाले की, फिफातील भ्रष्टाचार दूर करण्याचे प्रयत्न झाले नाहीत तर करार तोडूून टाकू. भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी फिफाने उचललेली पावले मॅकडोनाल्डलाही जाणून घ्यायची आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने न्यायमूर्ती लोढा समितीच्या अहवालाच्या आधारावर आवश्यक सुधारणांसाठी ठाेस अशी पावले उचलली आहेत. सर्वांच्या सहकार्याने गमावलेली पत पुन्हा मिळवण्यात मंडळ यशस्वी होईल, अशी आशा करूया.