आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिलीकडून व्हेनेझुएलाचा ५-० ने धुव्वा, फ्रान्सने रंगतदार लढतीत अल्बानियाला १-१ ने राेखले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तालकाहुनाे - आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात चिली संघाने व्हेनेझुएलाचा ५-० अशा फरकाने धुव्वा उडवला. याशिवाय काेलंबिया, काेरिया गणराज्यनेही शानदार विजयाची नाेंद केली. आंद्रे सांचेझ (१८ मि.), मिलर (७८ मि.) आणि हर्नाडेझ (९० मि.) यांनी केलेल्या खेळीच्या बळावर चिलीने विजयाची नाेंद केली. व्हॅल्डीविया (४५ मि.) आणि वार्गेस (५५ मि.) यांनीही विजयात प्रत्येकी एका गाेलचे याेगदान दिले. फ्रान्स अाणि अल्बानिया यांच्यातील मैत्रीपूर्ण सामना बराेबरीत राहिला. याशिवाय जाॅर्डन आणि अमेरिका संघाला या सामन्यात धक्कादायक पराभवाला सामाेरे जावे लागले.
गुटीरेझने (८७ मि.) केलेल्या शानदार गाेलच्या बळावर काेलंबिया संघाने सामना जिंकला. या गाेलच्या बळावर काेलंबियाने अमेरिकेला २-१ ने पराभूत केले. तत्पूर्वी बास्साने (६१ मि.) गाेल करून काेलंबियाला बराेबरी मिळवून दिली हाेती. अल्टीडाेरेने (१० मि.) पेनाॅल्टी काॅर्नरवर गाेल करून अमेरिकेला १-० ने आघाडी मिळवून दिली हाेती. मात्र, या संघाचा सामन्यातील हा एकमेव गाेल ठरला.