आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाेगनिनी, त्साेंगाची विजयी सलामी; अांद्रे सेप्पी बाहेर, माेंटे कार्लाे मास्टर्स टेनिस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माेंटे कार्लाे - इटलीच्या फेबियाे फाेगनिनीसह ज्याे विल्फ्रेंड त्साेंगा अाणि गेल माेफिल्सने माेंटे कार्लाे मास्टर्स टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. यासह खेळाडूंनी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला. दुसरीकडे अांद्रे सेप्पीला पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामाेरे जावे लागले. त्याचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले.
फोटो - जेर्नी जानाेविकविरुद्ध सामन्यात परतीचा फटका मारण्याच्या प्रयत्नात इटलीचा फेबियाे फाेगनिनी. त्याने हा सामना जिंकून दुसरी फेरी गाठली.

इटलीच्या फाेगनिनीने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत जेर्नी जाेनाविकचा पराभव केला. त्याने शानदार खेळी करताना ६-३, ६-१ अशा फरकाने विजय साकारला. यासह त्याने स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली. पहिल्या सेटवर त्याला विजयासाठी झुंज द्यावी लागली. मात्र, यात सरस खेळी करत फाेगनिनीने बाजी मारून सामना नावे केला.

दुसरीकडे गेल माेफिल्सनेही सलामीच्या लढतीत विजय संपादन केला. त्याने कुज्नेत्साेवविरुद्ध राेमांचक विजय संपादन केला. त्याने ४-६, ६-३, ६-४ ने सामना जिंकला. मात्र, यासाठी त्याला तीन सेटपर्यत शर्थीची झुंज द्यावी लागली. कुज्नेत्साेवाने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये बाजी मारून माेफिल्सला माेठा धक्का दिला. माेफिल्सने दमदार पुनरागमन केले. यासह त्याने दुसरा सेट अापल्या नावे केला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये वेगवान माेफिल्सने बाजी मारून कुज्नेत्साेवाला बाहेर केले.

त्साेंगाची अागेकूच
जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेल्या ज्याे विल्फ्रेंड त्साेंगाने दुसरी फेरी गाठली. त्याने पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात जे. स्ट्रफीचा पराभव केला. त्याने ६-४, ६-३ अशा फरकाने सामन्यात एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह इटलीच्या खेळाडूने सामना अापल्या नावे केला. या वेळी त्याला दाेन्ही सेटवर विजयासाठी कसरत करावी लागली. मात्र, सरस खेळी करून त्याने सामना अापल्या नावे केला.