आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत \'गोल्डन सिस्टर्स\', खानदानी आखाड्यात घाम गाळून बनल्या STAR

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- महिला पैलवान (डावीकडून) बबिता आणि गीता फोगट.)
हिसार (हरियाणा)- बाबा रामपाल यांच्यानंतर हरियाणातील हिसार जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आहे. पण आता मात्र कारण जरा वेगळे आणि सुखद आहे. भिवानी येथील बलाली गावातील बहिणी गीता, बबिता आणि विनेश फोगट कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण जिंकल्यानंतर भारताच्या गोल्डन मुली झाल्या आहेत. रुढिवादी मानसिकतेवर मात करीत या बहिणींनी खानदानी आखाड्यात घाम गाळून नाव कमवले आहे.
15 डिसेंबर 1988 रोजी गीताचा जन्म झाला. वयाच्या तेराव्या वर्षीच तिने रेसलिंगला सुरवात केली. तिला मिळालेले यश बघून तिच्या बहिणी बबिता आणि विनेश यांनाही कुस्तीत नशिब आजमावले. आज या तिनही बहिणींनी कुस्तीत मोठे नाव कमावले आहे.
खानदानी आखाड्यापासून ऑलिंपिकपर्यंतचा प्रवास
रुढिवादी मानसिकता बाजूला सारुन पैलवान महावीरसिंग यांनी त्यांच्या मुली गीता आणि बबिता यांना शेतातील खानदानी आखाड्यात कुस्तीचे डाव शिकवण्यास सुरवात केली. याचे यश 2010 मध्ये दिसून आले. मोठी मुलगी गीता हिने दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण जिंकले. तसेच 2012 च्या ऑलिंपिकमध्ये क्वालिफाय होणारी पहिली भारतीय महिला पैलवान झाली. यानंतर बबिताने ग्लासगोत सुवर्ण पदक जिंकले. एवढेच नव्हे तर विनेश हिने केवळ 20 वर्षींची असताना ग्लासगोत सुवर्ण आणि एशियाडमध्ये कांस्यपदक पटकावले.
बहिणीचे स्वप्न केले पूर्ण
गीता फोगट जखमी असल्याने 2014 च्या ग्लासगो कॉमनवेस्थमध्ये सहभागी होऊ शकणार नव्हती. परंतु, बबिता आणि विनेश यांनी पदके जिंकून दाखवले. याचा आनंद गीताला झाला. बहिणींना पाठवण्यापूर्वी गीता दोघींना म्हणाली होती, की जर तुम्ही पदक जिंकू शकल्या नाहीत तर तुमचा चेहरा मला दाखवू नका.
पुढील स्लाईडवर बघा, फोगट बहिणींचे फोटो... कुस्तीच्या आखाड्यात कमावले नाव....