आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृत्तपत्र लेखक हा समाजप्रबोधक - प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांचे प्रतिपादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘वर्तमानपत्रातील अग्रलेखाशेजारी वाचकांच्या पत्रांना स्थान असते. तो पत्रांच्या माध्यमातून संपादकांशी, वाचकांशी संवाद साधत असतो. अग्रलेख आवडल्यास भलामण करतो, त्रुटी आढळल्या तर टीकाही करतो. म्हणून पत्रलेखक लोकशिक्षकाची, समाजसेवकाची व समाजप्रबोधकाची भूमिका बजावतो,’ असे प्रतिपादन प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचने आयोजित केलेल्या जीवनगौरव पुरस्कार वितरणप्रसंगी डॉ. येळेगावकर बोलत होते.

ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक सिद्रामप्पा पाटील, पंढरपूरचे अशोक कोर्टीकर, अरुण मित्रगोत्री व अरुणकुमार हुच्चे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी, मनपा शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी विष्णू कांबळे, कार्यवाह फय्याज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

कै. तात्यासाहेब तेंडुलकर पुरस्कार व्ही. एम. जोजन यांना तर शोभना सागर पुरस्कार कुमारी संजीवनी देशपांडे यांना देण्यात आला. याच कार्यक्रमात वार्षिक पत्रलेखन पुरस्कार धोंडप्पा नंदे, इलियास सिद्दीकी, शैलेंद्र चौधरी यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे तर श्रीवल्लभ करमरकर, सुनील पुजारी, संध्या बनसोडे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार दिले. अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.