आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेक्स्ट गोल्फ ट्रॉफी; मराठवाड्यातील पहिली गोल्फ स्पर्धा आज रंगणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाड्यातील पहिली गोल्फ स्पर्धा नेक्स्ट ट्रॉफी रविवारी पडेगाव येथील एमजीएमच्या गोल्फ कोर्सवर रंगणार असून स्पर्धेत राज्यभरातील एकूण 30 खेळाडूंनी प्रवेश निश्चित केला आहे. स्पर्धेस सकाळी 8.30 वाजता सुरुवात होईल.
स्पर्धेत मुंबई, पुणे, अहमदनगर, नागपूर येथील खेळाडूंचा समावेश आहे. 18 आणि त्यापेक्षा कमी हँडिकॅप असलेल्यांचा गोल्डन ग्रुप आणि त्याहून अधिक हँडिकॅप असलेल्यांचा सिल्व्हर ग्रुप अशा दोन गटांत 18 होल्सची ही स्पर्धा स्ट्रोक प्ले पद्धतीने होणार आहे. विजेत्यांना 21, 11 हजार रुपये आणि इतर वैयक्तिक पारितोषिके दिली जाणार आहेत.
स्पर्धा पाहण्यासाठी येणाºया खेळाडूंचे गोल्फ संघटनेतर्फे विशेष स्वागत करण्यात येणार असल्याचे एमजीएम गोल्फचे संचालक रणजित कक्कड यांनी सांगतले. स्पर्धेच्या समारोप गोल्फ संघटनेचे अध्यक्ष व एमजीएम संस्थेचे सचिव अंकुशराव कदम यांच्या हस्ते सकाळी 11.30 वाजता होणार आहे. याप्रसंगी ए. एम. पटेल इन्फ्राचे भावेन अमीन, आर. के. काँस्ट्रोचे समीर मेहता, एक्स्पर्ट ग्लोबलचे मुकुंद कुलकर्णी, रणजित कक्कड, प्रशिक्षक राजेश सोनवणे यांची उपस्थिती राहील.