आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC Twenty 20 World Cup Will Be Held In India As Per ICC Schedule

भारत ट्वेंटी-20 विश्वचषकाचा पुढील यजमान, अंतिम सामन्यात निकालासाठी सुपर ओव्हर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- पुढील वर्षी भारतात ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज दिली. आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धेचा अंतिम सामना टाय झाला तर सुपर ओव्हरमध्ये निकाल लावला जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
पुढील वर्षी म्हणजेच 2016 मध्ये भारताला ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळणार आहे. 11 मार्च ते 3 एप्रिल 2016 या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. यापूर्वी 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात झाल्या होत्या.
गेली ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धा बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आली होती. यात भारताचा पराभव करुन श्रीलंकेने विजेतेपद मिळवले होते. दर दोन वर्षांनी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते.
विश्वचषक 2011 मध्ये होता सुपर ओव्हरचा नियम
आयसीसीच्या कोणत्याही सिरिजमधील अंतिम सामना टाय झाला तर सुपर ओव्हरमध्ये निकाल लावण्याची तजविज यावेळी करण्यात आली होती. 2011 च्या विश्वचषकात हा नियम ठेवण्यात आला होता. परंतु, त्यानंतर तो रद्दबातल करण्यात आला.
काय आहे सुपर ओव्हर
एखाद्या सामन्यात दोन्ही संघांनी समान स्कोअर केला तर तो टाय समजला जातो. अशा वेळी दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेता घोषित करण्यात येते. त्यामुळे दोन्ही संघांना अंक वाटून दिले जातात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सुपर ओव्हरची संकल्पना लागू करण्यात आली आहे. यात दोन्ही संघांना प्रत्येकी एक ओव्हर आणि दोन विकेट मिळतात. जी टीम सर्वाधिक धावा करते तिला विजेता घोषित केले जाते.