आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायजेरिया फुटबॉल संघाने जिंकला आफ्रिका नेशन्स चषक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहान्सबर्ग - मायकल जॉनच्या नेतृत्वाखाली नायजेरिया फुटबॉल संघाने आफ्रिका नेशन्स चषक जिंकला. नायजेरियाने अंतिम सामन्यात बर्किना फासोला 1-0 अशा फरकाने पराभूत केले. एबाने केलेल्या 40 व्या मिनिटाला केलेल्या सुरेख गोलच्या बळावर नायजेरियाने विजय मिळवला. नायजेरियाने तिस-यांदा आफ्रिका नेशन्स चषकावर आपले नाव कोरले. यापूर्वी 1980, 1994 मध्ये नायजेरिया टीम अजिंक्यपदाची मानकरी ठरली होती.

विजेतेपदासाठी रंगलेल्या रोमांचक लढतीत दोन्ही संघांनी दमदार सुरुवात केली. तब्बल 39 व्या मिनिटापर्यंत ही लढत 0-0 ने बरोबरीत खेळवली गेली. अखेर 24 वर्षीय एबाने 40 व्या मिनिटाला ही बरोबरीची कोंडी फोडली. त्याने बर्किनाच्या गोलरक्षकाने केलेल्या चुकीचा फायदा घेत नायजेरियाकडून पहिला गोल केला. या गोलच्या बळावर नायजेरियाने आघाडी घेतली.