आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषक : वेस्ट इंडीज संघात मिलरचा समावेश, सुनील नरेनच्या जागी लागली वर्णी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- आगामी विश्वचषकात निकिता मिलरला वेस्ट इंडीज संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली अाहे. त्याचा स्पिनर सुनील नरेनच्या जागी संघात समावेश करण्यात अाला. यासाठी अायसीसीने हिरवा कंदील दाखवला. येत्या १४ फेब्रुवारीपासून विश्वचषकाला प्रारंभ हाेत अाहे.
३२ वर्षीय मिलरने अातापर्यंत ४५ वनडेत वेस्ट इंडीज संघाचे प्रतिनिधित्व केले अाहे. यात ४० विकेट घेतल्याची नाेंदही त्याच्या नावे अाहे. अाता त्याला मार्च २०१४ नंतर पुनरागमन करण्याची संधी मिळाली अाहे. विंडीजच्या सुनील नरेनने माघार घेतली. अवैध गाेलंदाजीमुळे सध्या विंडीजचा हा गाेलंदाज चांगलाच चर्चेत अाहे. तत्पूर्वीच त्याने हा निर्णय घेतला. त्यामुळे मिलरला खेळण्याची संधी देण्यात अाली.
16 फेबु.ला सामना
वेस्ट इंडीजचा स्पर्धेच्या ब गटात समावेश करण्यात अाला. या गटात भारतासह पाक, द. अाफ्रिका, झिम्बाब्वेसारख्या संघाचा समावेश अाहे. याशिवाय अायर्लंड, यूएईचाही समावेश अाहे. १६ फेब्रुवारीला वेस्ट इंडीज अापल्या माेहिमेचा शुभारंभ करेल. या वेळी विंडीज व अायर्लंड संघ समाेरासमाेर असतील.